मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले भारताचे अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगट व बजरंग पुनिया यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुब्रमण्यम प्रसाद व कुस्ती संघटनेच्या समितीने दिलासा दिला आहे. या समितीने घेतलेल्या निर्णयामुळे आगामी एशियन गेम्ससाठी चाचणी न देता या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता येईल.
एशियन गेम्ससाठी पात्रता फेरी न देता थेट खेळवण्याची मागणी या खेळाडूंनी केलेली. त्याला आव्हान देणारी याचिका अंकिता पंघल व सुजीत कलकल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दिली होती. मात्र, ही ही याचिका न्यायालयाने रद्द ठरवली.
या खटल्याच्या सुनावणी वेळी उच्च न्यायालयाने सांगितले की, आम्ही हे ठरवणार नाही की सर्वोत्तम कचस्तीपटू कोण आहे? आम्ही केवळ निवड करताना प्रक्रिया पाळली गेली की नाही हेच बघू. शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवत, शनिवारी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. बजरंग पुरुषांच्या फ्रीस्टाइल 65 किलो गटात आणि विनेश महिलांच्या 53 किलो गटात ही स्पर्धा खेळताना दिसतील.
महत्वाच्या बातम्या –
हरमनप्रीतचा रूद्रावतार! सामन्यानंतर काढले बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे वाभाडे, म्हणाली…
“सध्या बेअरस्टो जगातील सर्वोत्तम फलंदाज”, दिग्गजाने मॅंचेस्टर कसोटीतील खेळीनंतर वाहिली स्तुतीसुमने