भारतीय महिला कुस्तीपटू आणि बृजभूषण सिंग यांच्यातील वाद अद्याप मिटला नाहीये. नुकत्याच पार पडलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत संजय सिंग निवडून आले. त्यांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद स्वीकारले देखील. पण संजय हे बृजभूषण यांचेच सहकारी असल्यामुळे कुस्तीपटूंमध्ये राहाची पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (26 डिसेंबर) राष्ट्रकूल आणि आशियाई गेम्समधील सुवर्णपदकविजेती विनेश फोगाट हिने मोठा निर्णय घेतला.
भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी संजय सिंग (Sanjay Singh) यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर क्रीडा जगातात काही मोठ्या घटना घडल्या. देशाला ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून देणाऱ्या साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने कृस्तीमधून निवृत्ती घेतली. तसेच ऑल्पिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बजरंग पुनिया (Bajrang Punia) याने आपला पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिनेही आपला पद्मश्री आणि मेजर ध्यानचंद क्रीडा रत्न पुरस्कार सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला.
आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून विनेशने ही माहिती सर्वांना दिली. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विनेशने मोठे पत्र लिहिले आणि सोशल मीडियावरून पोस्ट देखील केले आहे.
मैं अपना मेजर ध्यानचंद खेल रत्न और अर्जुन अवार्ड वापस कर रही हूँ।
इस हालत में पहुँचाने के लिए ताकतवर का बहुत बहुत धन्यवाद 🙏 pic.twitter.com/KlhJzDPu9D
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) December 26, 2023
दरम्यान, जानेवारी 2023 मध्ये भारतीय कुस्तीपटू आणि तत्कालिन कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यातील वादाला सुरूवात झाली. महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक झळाचे आरोप केले होते. बृजभूषण यांनी मात्र सुरुवातीच्या काळात हे प्रकरण हलक्यात घेतल्याचे दिसले. काही महिन्यांनंतर मात्र हा वाद अधिकच तापला. कुस्तीपटूंनी न्यायलात धाव घेतल्यानंतर बृजभूषण यांच्याविरोधात एफआयर दाखल झाली. याप्रकरणातील चौकशी अद्याप सुरू असून यादरम्यानच त्यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षदाचा राजीनामा द्यावा लागला.
न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला उभे राहता येणार नव्हते. याच पार्श्वभूमीव बृजभूषण यांचे सहकारी संजय सिंग यांना निवडणुकीत अध्यक्षपदाचा चेहरा म्हणून पुढे केले गेले. 47 पैक 40 मते संजय यांना मिळाली आणि अध्यक्षपद पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे बृजभूषण यांच्याच हातात आले. त्यामुळेच कुस्तीपटूंच्या आंदोलनाला एकप्रकारे अपयश आल्याची भावणा कुस्तीपटूंमध्ये पाहयाला मिळाली. याच पार्श्वभूमीवर साक्षी मलिकची निवृत्ती आणि बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केल्यानंतर सकारनेही कुस्ती महासंघाची नवनियुक्ती समिती बरखास्त केली. (Vinesh Phogat decided to return the Arjuna and Padma Shri awards to the government to bring justice to the wrestlers)
महत्वाच्या बातम्या –
धावा करूनही राहुलवर प्रश्न उपस्थितीत होतात! माजी दिग्गजाचे विधान चर्चेत, वाचा सविस्तर
माजी दिग्गज फलंदाजाने राहुलच्या शानदार खेळीचे केले कौतुक, म्हणाला, ‘तुम्ही त्याची खेळी…’