---Advertisement---

“विनेश, तू चॅम्पियन…”,ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर

On: बुधवार, ऑगस्ट 7, 2024 1:22 PM
---Advertisement---

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटची ऑलिम्पिक मधील प्रवास खूपच खडतर राहिला आहे. विनेशने टोकियो ऑलिम्पिकमधून खेळाच्या महाकुंभात पदार्पण केली होती. पण त्याच ऑलिम्पिक स्पर्धेतून दुखापतीमुळे तिला बाहेर पडावे लागले. तत्तपूर्वी यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अतिवजन असल्यामुळे ती अपात्र ठरली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील महिला 50 किलोच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेपूर्वी तिचे 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने ती अपात्र ठरली आहे. यावर आता पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहले की, “विनेश, तू चॅम्पियन आहेस! तु भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहे. आजचं अपयश दुख:दायक आहे. मला वाटत असलेली निराशा मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आम्ही सर्व तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत”

तत्तपूर्वी विनेश फोगटने 50 किलो फ्रीस्टाइल गटात काल (06 ऑगस्ट) मैदानात उतरली होती. तिने तिचा पहिला सामना 16 च्या फेरीत खेळला, ज्यामध्ये तिचा सामना जपानच्या युई सुसाकीशी झाला. विनेशने युई सुसाकीचा 3-2 असा पराभव करत पुढील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत विनेशचा सामना युक्रेनच्या ओक्साना लिवाचशी झाला. विनेशने ओक्सानाचा 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर उपांत्य फेरीत विनेशचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमनशी झाला. विनेशने उस्नेलिसचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केली होती.

हेही वाचा-

ब्रेकिंग बातमी! विनेश फोगट ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र!
“मोदींचा विरोध केला, तरीही संधी मिळाली…”, विनेश फोगटच्या विजयावर कंगना रनौतची खोचक प्रतिक्रिया
ढोल-ताशांच्या गजरात…पुष्पवृष्टी उधळत.., दिल्ली विमानतळावर मनू भाकरचं जंगी स्वागत, पाहा VIDEO

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---