कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या फायनलमधून (50 किलो वजनी गट) अपात्र ठरवण्यात आलं आहे. फायनलपूर्वी तिचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅमनं जास्त भरलं. यावर आता तिच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विनेशच्या कुटुंबीयांनी फेडरेशनवर कट रचल्याचा आरोप केला आहे.
विनेशचे सासरे राजपाल राठी म्हणाले, “100 ग्रॅम वजन खूप नाही. डोक्यावरील केसांमुळेही एवढं वजन वाढतं. याशिवाय त्यांनी सरकार आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. यामागे सरकार आणि ब्रिजभूषण सिंह यांचा हात असल्याचं ते म्हणाले. राजपाल राठी म्हणाले, “ही धक्कादायक बातमी असून राजकारण केलं जात आहे. हा एक कट आहे. यामागे सरकारचा हात आहे. 100 ग्रॅम वजन जास्त झाल्यामुळे कोण बाहेर काढतं? सपोर्ट स्टाफनं कोणत्याही प्रकारची मदत केली नाही.”
ते पुढे म्हणाले, “मी अद्याप विनेश फोगटशी बोललो नाही. माझ्याविरोधात कट रचला जात असल्याचं विनेशनं वारंवार सांगितलं आहे. फोगटनं जयपूर आणि इतर ठिकाणी अनेकदा असं वक्तव्य केलंय.
विनेश फोगटनं एकाच दिवसात एकूण तीन सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सर्वप्रथम तिनं जपानच्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव केला. यानंतर तिनं पुढील फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा पराभव केला. विनेशनं ओक्सानाचा 7-5 असा पराभव केला होता. त्यानंतर विनेशनं उपांत्य फेरीत गुझमन लोपेझचा पराभव केला. विनेशनं उपांत्य फेरीच्या सामन्यात 5-0 असा शानदार विजय मिळवला होता. उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर तिला आज (8 ऑगस्ट) रात्री 12.30 वाजता अंतिम सामना खेळायचा होता.
हेही वाचा –
ब्रेकिंग बातमी! विनेश फोगट ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र!
“मोदींचा विरोध केला, तरीही संधी मिळाली…”, विनेश फोगटच्या विजयावर कंगना रनौतची खोचक प्रतिक्रिया
आधी दुखापत, शस्त्रक्रिया आणि आंदोलन…पॅरिस ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास विनेश फोगटसाठी सोपा नव्हता