---Advertisement---

मायदेशी पोहोचताच विनेश फोगट भावूक! बजरंग-साक्षीने दिली हिंमत

On: शनिवार, ऑगस्ट 17, 2024 12:19 PM
---Advertisement---

भारतीय महिला कुस्तीपटू पॅरिसहून भारतात परतली आहे. आज (17 ऑगस्ट) रोजी सकाळी ती दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले, ज्यामध्ये भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांचेही आगमन झाले. विनेशचे विमानतळावर जोरदार नाच-गाणी करून स्वागत करण्यात आले.

विमानतळाबाहेर आल्यानंतर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी तिच्याशी बोलून तिचे सांत्वन केले. विनेशला रौप्य किंवा सुवर्णपदक मिळाले नसेल, पण (CAS) मधील सुनावणीदरम्यान संपूर्ण देश तिच्या पाठीशी उभा राहिला. आता विनेशचे विमानतळावर कोणत्याही सुवर्णपदक विजेत्याप्रमाणेच स्वागत करण्यात आले होते.

विनेश फोगट विमानतळावर पोहोचल्यावर देशवासीयांचे प्रेम पाहून ती भावूक झाली. तिच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. विनेश फोगट संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. दुर्दैवाने, अंतिम सामन्यापूर्वी, तिचे वजन निर्धारित प्रमाणापेक्षा 100 ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले, ज्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हे प्रकरण (CAS)  पर्यंत पोहोचल्यावर रौप्य पदक देण्याचे तिचे अपील फेटाळण्यात आले.

विनेश परतण्यापूर्वी तिचा भाऊ हरिंदर सिंग याने मीडियाशी बोलताना सांगितले होते, “कुस्ती आणि हा खेळ आवडणारे सर्व लोक विनेशचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी आले आहेत. प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक विनेशचे स्वागत करण्यासाठी आले होते. गावात विनेशच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

हेही वाचा-

पीआर श्रीजेशची जागा कोण घेणार? जाणून घ्या सर्वात मोठे 3 दावेदार
गोलंदाजांसाठी काळचं! पाहा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे घातक फलंदाज
बीसीसीआयचा ग्रीन सिग्नल? आयपीएल 2025 मध्ये धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---