---Advertisement---

मोठी अपडेट: सीएएसने फेटाळली विनेश फोगटची मागणी! नाही मिळणार रौप्य पदक

---Advertisement---

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटचे (Vinesh Phogat) अपील सीएएसने (CAS) फेटाळलं आहे, म्हणजेच आता तिला रौप्य पदक मिळणार नाही. विनेशला अंतिम सामन्याच्या दिवशी निर्धारित वजनापेक्षा 100 ग्रॅम जास्त वजन भरल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympic) अपात्र ठरवण्यात आलं होतं. या संदर्भात तिनं रौप्य पदक देण्याचे अपील केलं होतं, त्याचा निर्णय 16 ऑगस्ट रोजी जाहीर होणार होता, मात्र आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हे अपील फेटाळण्यात आलं आहे.

या संदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनीही आश्चर्य व्यक्त केले असून या निर्णयामुळे सर्वांना धक्काच बसला. विनेशनं (7 ऑगस्ट) रोजी रौप्य पदक देण्याचं आवाहन केलं होतं आणि सीएएसनं (CAS) ही मागणी मान्य केली होती. (9 ऑगस्ट) रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली, ज्यामध्ये विनेशची बाजू 4 वकिलांनी मांडली होती. ज्यामध्ये उत्कृष्ट भारतीय वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताचा स्टार फिरकीपटू ‘या’ लीगमध्ये घालतोय धुमाकूळ…!
“माझ्यासाठी तुम्ही सर्व सुवर्णपदक विजेते…” राष्ट्रपतींनी केलं ऑलिम्पिक पदक विजेत्यांचं अभिनंदन!
दुलीप ट्राॅफीसाठी 4 संघ जाहीर…! पंत-सूर्या नाही, तर ‘या’ स्टार खेळाडूंना मिळाले कर्णधारपद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---