2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार मानली जाणारी भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला जास्त वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आलं आहे. यानंतर आता बातमी आली आहे की, विनेश फोगटची प्रकृती बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
डिहायड्रेशनमुळे विनेश फोगटला स्पोर्ट्स व्हिलेजमधील पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती गंभीर नसून, तिला लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो.
विनेश 50 किलो वजनी गटात खेळते. मात्र फायनल सामन्यापूर्वी तिचं वजन 100 ग्रॅम जास्त भरलं होतं, ज्यामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं. सर्व भारतीयांना विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. काल रात्री तिनं उपांत्य फेरीत शानदार विजयाची नोंद केली होती.
विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यात सरकार आणि ब्रिजभूषण सिंह यांचा हात असल्याचं ते म्हणाले. विनेश रात्री 12.30 वाजता (8 ऑगस्ट) अंतिम सामना खेळणार होती. अंतिम सामन्यात विनेशचा मुकाबला अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडशी होणार होता.
नियमांनुसार अपात्र ठरल्यानंतर आता विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणतंही पदक जिंकता येणार नाही. याचा अर्थ अंतिम फेरीत पोहोचूनही विनेशला पदकाविना मायदेशी परतावं लागेल. आता विनेश फोगटला रौप्य आणि कांस्यपदकही मिळू शकणार नाही.
हेही वाचा –
2 कुस्तीपटू आणि 2 मोठे वाद; विनेश फोगट आणि निशा दहिया यांच्याकडून पदक हिसकावले?
“विनेश, तू चॅम्पियन…”,ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर
“विनेशविरुद्ध कट रचला, यामागे सरकारचा हात”; कुटुंबीयांचा गंभीर आरोप