सध्या सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सोशल मीडिया हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक झाला आहे, असं म्हणायला वावग ठरणार नाही. परंतु, सोशल मीडियाचा अतीजास्त वापर घातक देखील ठरू शकतो. कारण सायबर चोर सोशल मीडियाद्वारे लाखो रुपयांचा गंडा घालू शकतात. असाच काहीसा प्रकार दिग्गज भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी सोबत घडला आहे.
सायबर चोर हे भोळ्या भाबड्या लोकांना फसवून लाखो रुपयांचा गंडा घालत असतात. ते कॉल करून, मेसेज करून किंवा लिंक शेअर करून फसवण्याच काम करत असतात. असाच काहीसा प्रकार माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यासोबत घडला आणि सायबर चोरांनी त्यांच्या खात्यातून १ लाख रुपये काढले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, “सायबर चोरांनी विनोद कांबळीला बँक अधिकारी म्हणून कॉल केला. त्यानंतर त्यांना एक लिंक शेअर केली. त्यावेळी सायबर चोरांनी त्यांना लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. त्यांनी लिंकवर क्लिक करताच त्याच्या बँक खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले.” खात्यातून १ लाख रूपये काढताच त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. याबाबत त्यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार केली आहे.
सावधगिरी बाळगणे गरजेचे
प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना जागरुक करून सायबर चोरांपासून सावध राहण्यास सांगितले जाते. जर कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल आला, तर नेहमी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. इंटरनेट बँकिंग लॉगिन आणि पासवर्ड वेळोवेळी बदलत राहिले पाहिजे. बँकाही आपल्या ग्राहकांना मेसेज आणि फोनद्वारे सायबर चोरांपासून सावध राहण्याचे सांगत असतात. व्यवहाराचा ओटीपी चुकूनही कोणाला शेअर करू नका.
विनोद कांबळी यांची कारकीर्द
विनोद कांबळी यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी १७ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी ४ शतक आणि ३ अर्धशतकांच्या साहाय्याने १०८४ धावा केला. तर १०४ वनडे सामन्यात त्यांनी २ शतक आणि १४ अर्धशतकांच्या साहाय्याने २४७७ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या :
मातब्बर गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमधून बाहेर झाली विराटची पत्नी अनुष्का शर्मा, पण का?
कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा एजाज आयपीएल खेळण्याबाबत म्हणाला असं काही, वाचा