टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यानंतर त्याच्या तब्येतीची बरीच चर्चा झाली. विनोद कांबळी एकेकाळी खूप दारू प्यायचा. त्यामुळे त्याचं करिअर बर्बाद झालं हे सर्वांना माहीत आहे. कांबळीचं शरीर आज सुस्त आणि अशक्त झालं असेल, मात्र एकेकाळी त्याची ऊर्जा आश्चर्यकारक होती.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कांबळी एका प्रॉडक्टची जाहिरात करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये तो वर्कआउट करताना दिसतोय. व्हिडिओमध्ये त्याची बॉडी अप्रतिम दिसत आहे. हा व्हिडिओ खूप जुना असून कांबळी त्यावेळी बराच तरुण होता. त्याची तेव्हाची फिटनेस पाहता त आजच्या विराट कोहली आणि रवींद्र जडेजालाही मात देऊ शकतो, असं वाटतं. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
View this post on Instagram
विनोद कांबळीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा ग्राफ जितक्या वेगानं वर गेला तितकाच खाली आला. तो दारूच्या व्यसनात बुडाला होता. त्याच्या पत्नीनं त्याच्यावर अनेकवेळा मारहाणीचे आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत कांबळीनं अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची कबुली दिली होती. आता तो सर्व काही सोडून परत येण्यास तयार असल्याचंही तो म्हणाला.
विनोद कांबळीनं भारतासाठी एकूण 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. या कालावधीत त्यानं 1084 आणि 2477 धावा केल्या. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 2 द्विशतके आहेत. एकदिवसीय सामन्यातही त्यानं 2 शतकं झळकावली आहेत. विनोद कांबळी याचं आयुष्य सध्या बीसीसीआयच्या पेन्शनवर चालू असून, याशिवाय त्याच्याकडे पैशाचा दुसरा कोणताही स्रोत नाही.
हेही वाचा –
अखेरच्या कसोटी सामन्यात साऊदीचा बॅटनं धुमाकुळ! ख्रिस गेलच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी
गाबा कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया, चाहत्यांना खूश करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय!
असं कोण आऊट होतं भाऊ! केन विल्यमसननं मारली स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड, VIDEO व्हायरल