गुरुवारी(३० सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये चेन्नईने हैदराबादला सहा विकेट्स राखून मात दिली आहे. चन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या सामन्याचा शेवट एक अप्रतिम षटकार मारून केला. अखेरच्या षटकात चेन्नईला तीन चेंडूत दोन धावांची आवश्यकता असताना धोनीने हा षटकार मारला होता. चेन्नईने या सामन्यात मिळवलेल्या विजयासोबतच आयपीएलच्या प्लऑफमध्ये स्थान बनवले आहे. धोनीने मारलेल्या या षटकारानंतर सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. यामध्ये माजी खेळाडू विनोद कांबळी यांचाही समावेश झाला आहे.
दरम्यान, सामन्यात शेवटच्या षटकात हैदराबादचा सिद्धार्थ कौल गोलंदाजासाठी आला होता. या षटकात चेन्नईला विजयासाठी ३ धावांची आवश्यकता होती. षटकाच्या पहिला चेंडू अंबती रायुडूने निर्धाव खेळला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली आणि धोनी स्ट्राइकवर आला. धोनीने षटकातील तिसरा चेंडू निर्धाव घातला.
त्यानंतर हैदराबाद संघाला सामना जिंकण्याच्या आशा निर्माण झाल्या होत्या. पण कौलने चौथा चेंडू टाकताच कर्णधार धोनीने तो स्टेडियमच्या बाहेर मारला आणि चेन्नईने सामन्यात विजय मिळवला. हा षटकार पाहून चाहत्यांना २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची आठवण आली.
दरम्यान, धोनीने मारलेल्या या षटकारानंतर भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक विनोद कांबळी यांनी त्याचे कौतुक करत त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “धोनीने षटकाराने संपवले…आजही काहीच नाही बदललं यार!”
Dhoni finishing off with a six… Aaj bhi kuch nahi badla yaar!#SRHvCSK
— Vinod Kambli (@vinodkambli349) September 30, 2021
याव्यतिरिक्त समोसोचक हर्षा भोगलेंनीही त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक पोस्ट करत धोनीचे कौतुक केले आहे. भोगलेंनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “धोनी आणि षटकाराने सामन्याचा शेवट. कहानी अजून संपलेली नाही…” तसेच एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, फिनिशर अजून जिवंत आहे.
Dhoni and a six to finish. The story isn't over yet…..
— Harsha Bhogle (@bhogleharsha) September 30, 2021
दरम्यान, या सामन्यातील विजयानंतर सीएसकेने हंगामात खेळलेल्या एकून ११ सामन्यांपैकी ९ सामने जिंकले आहेत आणि १८ गुणांसह संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. सीएसकेने प्लेऑफमध्ये स्थान बनवले आहे. हैदराबाद या पराभवानंतर ११ पैकी ९ सामन्यांत पराभूत झाला आहे आणि गुणतालिकेत शेवटी आहे. हैदराबादच्या प्लऑफमध्ये पोहचण्याच्या आशा संपलेल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
गेल्या तीन महिन्यांपासून गुलाबी चेंडू किटमध्ये घेऊन फिरली मंधना, ‘हे’ होते खास कारण
‘अजून १०-१५ धावा असत्या तर चेन्नईला हरवू शकलो असतो’, पराभवानंतर विलियम्सनची प्रतिक्रिया