क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेरिलबोन क्रिकेट क्लबने (MCC) नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजेच फलंदाजाला मंकडींग पद्धतीने बाद केल्यानंतर त्याला आता धावबाद म्हटले जाणार आहे, ना की मंकडींग. एमसीसीच्या या निर्णयानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू विनू मकड यांचे सुपुत्र राहुल यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मंकडींग म्हणजे खेळाडूला बाद करण्याची, ती पद्धत ज्यामध्ये गोलंदाज चेंडू टाकण्याच्या आधीच खेळपट्टीवरील खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवतो. गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी जेव्हा धावत येतो, तेव्हा अनेकदा फलंदाज क्रिजच्या पुढे निघालेला असतो. अशात काही वेळा गोलंदाज चेंडू टाकण्याऐवजी तो नॉन स्ट्राइकच्या स्टंपवर लावतो. परिणामी खेळाडूला विकेट गमवाली लागते. खेळाडूला बाद करण्याच्या या पद्धतीली अनेकजण चुकीची पद्धत मानत असायचे. मात्र, आता एमसीसीने याला वैध म्हटले आहे.
विनू मांकड (Vinoo Mankad) यांनी १९४७-४७ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वप्रथम ही पद्धत वापरली होती आणि तेव्हापासूनच याचे नाव मंकडींग असे पडले होते. आता एमसीसीने हे नाव बदलून धावबाद असे केले आहे. विनू मंकड यांचे पुत्र राहुल मागच्या बऱ्याच दिवसांपासून मंकडींगचे नाव बदलण्यासाठी झगडत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना राहुल म्हणाले की, “ही निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ होती. समस्या ही आहे की, बाद होण्याच्या या पद्धतीला खेळ भावनेशी जोडले गेले. मागच्या काही वर्षांमध्ये क्रिकेट खूप बदलले आहे. अशात स्पष्ट सांगायचे तर नैतिकतेला जास्त जागा राहिलेली नाही. नॉन स्ट्राइकर एंडवर फलंदाज धावबाद झाल्यानंतरच का खेळ भावनेची गोष्ट उभी राहते ? अनेकदा असे होते की, फलंदाजाला माहीत असेत की, चेंडू त्याच्या बॅटचा किनार घेऊन गेला आहे, पण तो मैदान सोडत नाही. तसेच खेळाडूही दावा करतात की, त्यांची झेल सफाईने घेतला आहे. पण खरे तर चेंडू पुढेच पडलेला असतो. एवढेच नाही, तर चेंडूसोबत छेडछाडही केली जाते. अशात खेळ भावनेसारखी गोष्ट राहिली कुठे आहे ?”
दरम्यान, राहुल मंकड मोठ्या काळापासून मौकडींग विषयी लढाई लढत होते. यासंदर्भात त्यांनी अनेकदा तक्रार केली होती. त्यांनी आयसीसी आणि एमसीसीकडे यासाठी यासंबंधीत नियम बदलण्याची मागणी केली होती. तसेच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना राहुल यांनी पत्र लिहिले होते.