---Advertisement---

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील ‘व्हायरल गर्ल’, तमन्ना ते काव्यासारख्या सौंदर्यवतींचा समावेश

On: बुधवार, ऑक्टोबर 6, 2021 7:03 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. परंतु बीसीसीआयच्या अथक प्रयत्नांमुळे या स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू आहे. आयपीएल स्पर्धेच्या प्रत्येक हंगामात अशा काही सौंदर्यवती आहेत, ज्या कॅमेऱ्यामॅनच्या नजरेत आल्या आणि रातोरात प्रसिद्ध झाल्या. अशा काही सौंदर्यवती आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात देखील पाहायला मिळाल्या. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल

काव्या मारन : काव्या मारन ही सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. ती त्यांच्या व्यवसायामध्ये देखील मदत करत असते. तसेच अनेकदा ती सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित असते. आपला संघ जिंकल्यानंतर किंवा पराभूत झाल्यानंतर, तिने दिलेले रिॲक्शन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.

नवनीता गौतम : काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसनचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो डगआऊटमध्ये बसून एका मुलीसोबत फ्लर्ट करताना दिसून आला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्या फोटोमध्ये असलेल्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. ती व्हायरल झालेली मुलगी दुसरी तिसरी कोण नसून, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य आहे. ती या संघाची मसाज थेरपिस्ट आहे.

तमन्ना वाही : तसेच क्रिकेट चाहत्यांच्या मनात आणखी एका सौंदर्यवतीने स्थान निर्माण केले आहे. ही सौंदर्यवती दुसरी तिसरी कोण नसून, टिव्ही प्रेसेंटर तमन्ना वाही आहे. तमन्ना वाही एक अँकर, टिव्ही प्रेसेंटेटर आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर आहे. तिचा जन्म यूएईमध्ये झाला असून ती सध्या अबू धाबीमध्ये राहते.

https://www.instagram.com/p/CRtuN8frU46/?utm_medium=copy_link

साशा डीकॉक : मुंबई इंडियन्स संघाचा सलामीवीर फलंदाज आणि दक्षिण आफ्रिका संघाचा विस्फोटक फलंदाज क्विंटन डीकॉकची पत्नी साशा डीकॉक सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ती मुंबई इंडियन्स संघाला समर्थन करण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावत असते. साशा यापूर्वी आयपीएल स्पर्धेत चीयरलीडर होती. त्यानंतर क्विंटन डीकॉक आणि साशाचे प्रेम प्रकरण सुरू झाले होते. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.

https://www.instagram.com/p/CUCq6jABqLL/?utm_medium=copy_link

डॅनियल डीविलियर्स : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करत असलेला एबी डिविलियर्स जेव्हा मैदानात येतो, तेव्हा चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत असतो. एबी डीविलियर्स हा अप्रतिम फलंदाज आहे. तर त्याची पत्नी डॅनियल डीविलियर्स ही देखील मॉडेलपेक्षा काही कमी नाही. २०१३ मध्ये एबी डिविलियर्सने डॅनियल डीविलियर्सला प्रपोज केले होते. त्यानंतर काही दिवसांनी हे दोघे विवाह बंधनात अडकले होते.

https://www.instagram.com/p/CLR5Dv-ARpE/?utm_medium=copy_link

डॅनियल डीविलियर्स सध्या यूएईमध्ये आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सामना सुरू असताना ती मैदानात हजेरी लावून एबी डीविलियर्सला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला चीयर करताना दिसून येत असते.

महत्त्वाच्या बातम्या-

चेहरा ओळखीचा दिसतोय ना? आयपीएलमध्ये ग्लॅमरचा तडका लावणारी ‘तान्या पुरोहित’, अनुष्काशी आहे खास नाते

फिलिप्स ५० मीटरपर्यंत धावला, चेंडू बाउंड्रीला लागायच्या आत चौकार अडवला; फिल्डिंग बघून म्हणाल, अय्योव!

कोहलीची हाव कधीही संपत नाही, त्याला जगात सर्वोत्कृष्ट बनायचंय; माजी सहकाऱ्याने गायले गुणगान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---