पार्लमध्ये खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुल याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा दबदबा पूर्णपणे दिसून आला. भारतीय संघाने निर्णायक सामना जिंकून मालिका 2-1 अशी जिंकली. आता 26 डिसेंबरपासून उभय संघांमधील 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. रोहित शर्मा कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.मात्र, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज फलंदाजीला आला तेव्हा केएल राहुल आणि त्याच्यातील एक मजेदार संवाद कॅमेऱ्यात कैद झाला, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू केशव महाराज (Keshav Maharaj) हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे आणि त्याचे भारताशी विशेष नातं आहे. याशिवाय, त्याचा हिंदू धर्मावर दृढ विश्वास आहे आणि तो हनुमानजींचा खरा भक्त देखील आहे. अशा स्थितीत भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केशव महाराज फलंदाजीसाठी क्रिजवर आला तेव्हा स्टेडियममध्ये राम सिया राम हे गाणे वाजू लागले.
अशा स्थितीत भारताचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने विचारले, “केशवभाई, तू जेव्हाही येतो तेव्हा हे गाणे वाजतं.” राहुलने हे बोलल्यावर केशवच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/on_drive23/status/1737893015879057886?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1737893015879057886%7Ctwgr%5Ea5b64c62ba2b1e14e24e6e2d8ccb462846fea028%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Fkl-rahul-keshav-maharaj-ram-siya-ram-conversation-video-sa-vs-ind-3rd-odi-2023%2Farticleshow%2F106195804.cms
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय क्रिकेट संघाने 50 षटकांत 8 विकेट्स गमावून 296 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. यंघ 45.5 षटकांत 218 धावांत सर्वबाद झाला. भारताकडून फलंदाजी करताना संजू सॅमसन (Sanju Samson) याने दमदार शतक (108) केले तर अर्शदीप (Arshdeep Singh) सिंग याने 4 विकेट्स घेतल्या. (Viral video When you come to bat they play Ram Siya Ram Rahul’s voice caught on stump mic)
हेही वाचा
बाप तसा बेटा! राहुल द्रविडचा मुलगा समितचा क्रिकेटमध्ये भीमपराक्रम
राहुलच्या नेतृत्वात घडला इतिहास, तिसऱ्या वनडेत विजय मिळवत मालिका भारताच्या खिशात