दक्षिण आफ्रिका आणि भारत (SAvIND) यांच्यादरम्यान केपटाऊन (Capetown Test) येथे कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय तितकासा यशस्वी ठरला नाही. भारतीय संघ पहिल्या दिवशी केवळ २२३ धावा काढत सर्वबाद झाला. विराटने एकाकी झुंज देत ७९ धावा केल्या. मात्र, त्याचा शतकांचा दुष्काळ हा कायम राहिला.
जोहान्सबर्ग कसोटीला दुखापतीमुळे मुकलेल्या विराटने या सामन्यातून पुनरागमन केले. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विराटने अत्यंत आत्मविश्वासाने फलंदाजी केली. आपले सर्व साथीदार एका बाजूने बाद होत असताना विराटने ७९ धावांची लाजवाब खेळी केली. रबाडाने त्याची ही खेळी संपुष्टात आणली.
विराटने नोव्हेंबर २०१९ मध्ये आपले अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले होते. तेव्हापासून त्याने कसोटीच्या २६ डावात तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ६१ डावांमध्ये त्याने शतक ठोकले नाही. तसेच विराटने नोव्हेंबर २०१९ पासून प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये ७५ धावांचा पल्ला पार केला. केपटाउन कसोटी त्याच्या कारकिर्दीतील ९९ वी कसोटी आहे. त्याने आपले अखेरचे शतक ८४ व्या कसोटी झळकावलेले. मात्र, तेव्हापासून तो शतक ठोकू शकला नाही. या काळात त्याने केवळ सहा अर्धशतके बनवली आहेत.
भारतीय संघाची कचखाऊ फलंदाजी
केपटाउन येथील या महत्त्वपूर्ण कसोटी सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय उलटा पडला. केएल राहुल व मयंक अगरवाल हे सलामीवीर अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करू शकले नाहीत. चेतेश्वर पुजारा स्थिरावल्यानंतर ४३ धावा काढून बाद झाला. तर, अजिंक्य रहाणे व रिषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरले. विराट कोहलीच्या ७९ धावांच्या जोरावर भारतीय संघाने २२३ धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने सर्वाधिक ४ बळी मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन तेंडूलकरची बीसीसीआयमध्ये होणार एन्ट्री? वाचा काय म्हणाले जय शाह (mahasports.in)
द्रविड@49: पहिल्याच आयसीसी पुरस्कारांवर मोहोर उमटवणारा ‘मिस्टर डिपेंडेबल’ (mahasports.in)