---Advertisement---

विराट सचिनपेक्षा मोठा फलंदाज? जाणून घ्या ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या विधानामागचे कारण

Sachin Tendulkar Virat Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची क्रिकेटचा देव अशी ओळख आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके केली आहे. हा विक्रम मोडणे कोणासाठीच सोपी गोष्ट नाही. सचिनला केवळ भारताचाच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हटले जाते. असे असले तरी, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज उस्मान ख्वाजा याने विराट कोहली याला सचिनपेक्षा प्रभावी म्हटले आहे.

तसे पाहता सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्याशी तुलना शक्यतो कोणत्याच फलंदाजीची केली जात नाही. मात्र, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी नावे मागच्या काही वर्षात अनेकदा सचिनसोबत घेतली गेली आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विराट आणि सचिनची तुलना केली आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या मते विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधील आकडेवारी सचिनपेक्षाही उत्तम आहे. याच कारणास्तव या फॉरमॅटमध्ये त्याने सचिनपेक्षा विराट अधिक चांगला खेळाडू आहे, असेही म्हटले.

उस्मान ख्वाजा म्हणाला, “मी असे म्हणेल की, वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहली सचिन तेंडुलकपेक्षा चांगला आहे. जर तुम्ही या दोघांची आकडेवारी पाहिली, तर दोघांच्या शतकांची संख्या जवळपास सारखी आहे. पण विराट कोहलीने सचिनच्या तुलनेत खूप कमी सामने खेळले आहेत. मी मोठा झालो तेव्हा सचिनने बेंचमार्क सेट केला होता. पण विराट सध्या जे करत आहे, ते कोणीच केले नाहीये.”

दरम्यान, सचिन आणि विराटच्या वनडे क्रिकेटमधील प्रदर्शनावर नजर टाकली, तर माजी दिग्गजाने या फॉरमॅटमध्ये 49 शतके केली आहेत. तर दुसरीकडे विराटच्या नावावर आतापर्यंत 47 वनडे शतकांची नोंद आहे. विरानटे 284 वनडे सामन्यांमध्ये 13239 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे सचिनने 463 सामन्यांमध्ये 18426 धावा केल्या आहेत. अनेकांच्या मते विराट पुढच्या काही वनडे सामन्यांमध्ये वनडे शतकांच्या बाबतीत सचिनला मागे टाकेल आणि भविष्यात तो सचिनपेक्षा जास्त वनडे धावाही करेल. सचिनचा 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडण्यासाठीही विराट सर्वात प्रबळ दावेदार आहे. (Virat a bigger batsman than Sachin? The Australian opener said the reason)

महत्वाच्या बातम्या – 
बिग ब्रेकिंग! 128 वर्षांनंतर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश, ‘या’ खेळांनाही हिरवा कंदील
कोण मिळवणार पहिला विजय? 14व्या सामन्यात लंकेने जिंकला टॉस, ‘एवढ्या’ बदलांसह भिडणार कांगारूंशी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---