आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने बुधवारी (६ एप्रिल) एकदिवसीय रँकिंगची घोषणा केली आहे. ताज्या एकदिवसीय गुणतालिकेत भारतीय फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा आपल्या पहिल्याच जागी आहेत. फलंदाजीच्या एकदिवसीय गुणतालिकेत विराट ८११ गुणांसह दुसऱ्या, तर रोहित शर्मा ७९१ गुणांसह चौथ्या क्रमांकावर कायम आहेत. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेनंतर आयसीसीने ही रँकिंग जाहीर केली आहे.
नुकत्याच गुणतालिकेत पाकिस्तानचा फलंदाज इमाम उल हक सात क्रमांकांची उडी घेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एकदिवसीय मालिकेत शानदार शतक लगावणारा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी काॅक पाचव्या क्रमांकावर आहे.
तसेच नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिलेला फलंदाज राॅस टेलर तिसऱ्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. इंग्लंडचा जाॅनी बेयरस्टो सातव्या, तर दक्षिण आफ्रिकेचा रस्सी व्हॅन दर दसेन आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा डेविड वाॅर्नर नवव्या क्रमांकावर आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍराॅन फिंच सातव्या क्रमांकावरून थेट १०व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
गोलंदाजीमध्ये भारताचा वेगवान गोलंदाच जसप्रीत बुमराह ६७९ पाॅइंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी आठव्या स्थानांची मोठी उडी घेत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिल्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडचा ख्रिस वोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड एका क्रमांकाने उडी घेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे, तर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा १०व्या क्रमांकावर आहे. बांग्लादेशचा मेहंदी हसन नवव्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्यावेळी धोनीने ताहीरला काय सांगितले माहित नाही, पण माझा झेल गेला’, इशान किशनने सांगितला किस्सा
ऑस्ट्रेलियाचा विजयरथ सुसाट! पाकिस्तानविरुद्ध कसोटीनंतर आता टी२० मालिकाही केली नावावर






