---Advertisement---

विराट आणि रोहित ‘विजय हजारे ट्रॉफी’च्या सहाव्या फेरीत खेळणार नाहीत! शुबमन- श्रेयस मैदानात उतरणार

On: सोमवार, जानेवारी 5, 2026 8:16 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीच्या मंगळवारच्या सामन्यात खेळणार नाहीत. बीसीसीआयच्या (BCCI) नियमांनुसार, या दोघांनीही आधीच प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत.

विराटने दिल्लीसाठी खेळताना आंध्र प्रदेशविरुद्ध 131 आणि गुजरातविरुद्ध 77 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीमुळे दिल्लीचा संघ विजय मिळवू शकला.
विराट न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी अजून एक सामना खेळेल अशी शक्यता होती, पण दिल्लीचे प्रशिक्षक सरनदीप सिंह यांनी तो उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

रोहित शर्माने मुंबईसाठी आधीच दोन सामने खेळल्यामुळे तोही मंगळवारी खेळणार नाही. तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाल्यानंतर श्रेयस आता पुनरागमन करणार आहे. त्याला मुंबईच्या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. टी-20 वर्ल्ड कप संघातून बाहेर पडल्यानंतर शुबमन गिल (Shubman gill) पंजाबसाठी आपला पहिला सामना खेळण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्या (Hardik pandya & KL Rahul) आणि केएल राहुल हे दोन्ही खेळाडू देखील मंगळवारच्या सामन्यांत ॲक्शनमध्ये दिसतील. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी सर्व वरिष्ठ खेळाडूंनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये किमान दोन सामने खेळावेत, असे आदेश बीसीसीआयने दिले होते. त्यानुसार बहुतांश खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

भारतीय संघाचे सराव शिबिर (कॅम्प) 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता सर्व दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय मालिकेच्या तयारीला लागतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---