टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली होता. पराभवानंतर विराट आणि अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिकाला धमकी देणाऱ्या व्यक्तिला मुंबई उच्च न्यायलयाने आरोपांतून मुक्त केले. सोमवारी (10 एप्रिल) हा निर्णय घेतला गेला.
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे हैदराबादच्या एका व्यक्तिने विमिका कोहलीच्या बला’त्काराची धमकी सोशल मीडियावर दिली होती. या प्रकरणानंतर दिल्ली महिला आयोगाने विरोधात आवाच उढवला आणि हैदराबाद पोलिसांनी सॉफ्टवेअर इंजीनियर रामनगेश अकुबथिनी याला अटक केली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये त्याला अटक करण्यात आली आणि जामिनावर पुन्हा बाहेर देखील आहे. मागच्या वर्षी अकुबथिनीने या प्रकरणात त्याच्यावर केली गेलेली एफआयआर रद्द करावी यासाठी याचिका केली होती.
सोमवारी (10) न्यायालयात त्याची याचिका स्वीकारली गेली आणि एफआयआर रद्द करण्यात आली. न्यायमूर्ती एएस गडकरी आणि पीडी नाईक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. विराट कोहलीचे व्यवस्थापन आणि या प्रकरणात तक्रार करणाऱ्यांकडून देखील आरोपीवरील तक्रार मागे घेण्यास समहती दिली गेली. दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहलीच्या भारतीय संघाला तब्बल 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताला पराभूत केले होते.
या विश्वचषक भारतीय संघाच्या सुमार प्रदर्शनानंतर विराट कोहलीने भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले. तसेच या आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद देखील त्याने याच काळात सोडले. सध्या विराट आयपीएल 2023 मध्ये आरसीबीचे प्रतिनिधित्व करत आहे. हंगामातील पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात आरसीबीला अनुक्रमे कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. (Virat Anushka forgave the person who threatened Vamika! The High Court also quashed the FIR)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीसीबी मोठे नुकसान झेलण्यासाठी तयार? भारत आशिया चषकात खेळला नाही तर…
मी चांगलाच खेळलो! वाचा 20 चेंडूत 18 धावा करणारा केएल राहुलचे काय म्हणाला