टी20 विश्वचषक 2024 जिंकताच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली. विश्वचषक जिंकल्यानंतर सामना संपल्यानंतर समारंभात बोलाताना विराट कोहलीने सांगितले होते की टी20 मधून माझा हो शेवटचा सामना होता या पुढे युवा खेळाडूंना संघी दिली पाहिजे. आता कोहलीच्या या निर्णयावर त्याच्या लहानपणीचे कोच राजकुमार शर्मा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना राजकुमार शर्मा म्हणाले की, कोहलीच्या या निर्णयाचे कौतुक करतो. कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक म्हणाले, “विराटने हा निर्णय घेतला आहे आणि तो एका मोठ्या प्रसंगी घेतला गेला आहे, जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला होता आणि विराट कोहली अंतिम सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला होता. हा एक मोठा निर्णय आहे. कोणत्याही खेळाडूसाठी तो एवढ्या मोठ्या टप्प्यातून कोणत्याही फॉर्मेटला अलविदा करतो, हा त्याच्या निर्णयाची प्रशंसा करतो.
पुढे बोलताना म्हणाले, जसं की तो म्हणाला कि पुढे युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी. हा एक चांगला निर्णय आहे. ज्यामुळे विराट कोहलीला कसोटी क्रिकेट मध्ये जास्त लक्ष्य केंद्रित करता येईल. त्याचा तो आवडीची फाॅरमॅट आहे आणि त्यामध्ये त्यांने चांगली कामगिरी देखील केला आहे. त्याची कसोटी क्रिकेटकडे चांगली दृष्टी आहे. मला विश्वास आहे की आता तो तिथे अधिक लक्ष केंद्रित करू शकेल आणि देशासाठी चांगले काम करेल.
विराट कोहलीने टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शामदार खेळी खेळली होती. सुरुवातीच्या षटकात विकेट गेल्याने संघाला सावरात विराटने निर्णायक 76 धावांची खेळी खेळली होती. विराटने फायनमध्ये 59 चेंडूत 76 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 6 चाैकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खेळपट्टीची माती का चाखली? रोहित शर्मानं स्वत: केला खुलासा
या आयपीएल खेळाडूंची लागली लाॅटरी, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश
बॅडमिंटन कोर्टवर अचानक हार्ट अटॅक आला, तरुण खेळाडूचा तडफडून मृत्यू; VIDEO व्हायरल