ऍडलेड। भारताचा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक केले आहे.
हे शतक त्याने 108 चेंडूत पूर्ण केले आहे. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील 39 वे तर एकूण 64 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आहे. याबरोबरच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत कुमार संगकाराच्या 63 शतकांना मागे टाकले आहे.
तो या सामन्यात शिखर बाद झाल्यानंतर 8 व्या षटकात फलंदाजीला आला होता. त्यानंतर त्याने रोहित शर्माबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर अंबाती रायडूबरोबरही 59 धावांची भागीदारी केली आहे. पण रायडूही खेळपट्टीवर स्थिरावल्यावर बाद झाला आहे.
पण त्याचा विराटच्या फलंदाजीवर फरक पडला नाही. त्याने एमएस धोनीबरोबरही नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–आता फक्त पाॅंटींगच मध्ये, सचिन विराटमधील शतकांची दरी झाली कमी
–जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाला केले अफलातून धावबाद, पहा व्हिडिओ
–एमएम धोनीसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा वनडे या कारणासाठी आहे खास