रविचंद्रन अश्विनचा जेव्हा टी२० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघात समावेश करण्यात आला, तेव्हा या निर्णयाचे सर्वांना आश्चर्य वाटले होते. अश्विनचे चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारात पुनरागमन झाले आहे, त्याला युझवेंद्र चहलआधी प्राधान्य मिळाले आहे. २०१७ मध्ये अश्विनने वेस्ट इंडिज दौऱ्यावर आपला शेवटचा एकदिवसीय आणि टी२० सामना भारतीय संघाकडून खेळला होता. आता अश्विनच्या निवडीवर कोहलीने मौन सोडले आहे.
विराट कोहली म्हणाला, “अश्विनने मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी त्याच्या कौशल्यात मोठी भर घातली आहे. आता तो मोठ्या धैर्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत आहे. आम्ही अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये पाहत आलो आहोत, अश्विनने आक्रमक फलंदाजांविरुद्ध दमदार गोलंदाजी केली आहे आणि तो योग्य भागात गोलंदाजी देखील करत आला आहे. बरेच फिरकीपटू आक्रमक फलंदाजांना घाबरतात, पण अश्विनला त्याच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास आहे.’
अश्विनने ४६ टी२० सामन्यांमध्ये ५२ विकेट्स घेतल्या आहेत आणि चांगली गोष्ट म्हणजे त्याचा इकॉनॉमी रेट ७ पेक्षा कमी आहे. विराट कोहलीने विश्वास व्यक्त केला आहे की, आर अश्विनला आयपीएलमध्ये त्याच्या शानदार खेळासाठी हे बक्षीस मिळाले आहे.
विराट पुढे म्हणाला, ‘आम्ही पाहिले की अश्विन विविध प्रकारचे चेंडू टाकू शकतो, त्याच्या गोलंदाजीत नेहमी विविधता असते. तो एक खेळाडू आहे, ज्याने बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. त्याच्याकडे खूप आत्मविश्वास आहे. असे खेळाडू त्यांच्या स्पेलच्यादरम्यान सामन्याला कलाटणी देऊ शकतात.
याआधी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी अश्विनच्या समावेशाचे कारण दिले होते. त्याने म्हटले होते की, आयपीएलच्या गेल्या काही मोसमांमध्ये अश्विनची कामगिरी उत्कृष्ट होती. तीच गोष्ट त्याच्या बाजूने गेली आणि त्याला संघात समाविष्ट करण्यात आले. शर्मा पुढे म्हणाले की, जेव्हा तुम्ही विश्वचषक खेळायला जाता, तेव्हा एका ऑफस्पिनरची गरज भासते. सर्वांना माहित आहे की यूएईमध्ये आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यानंतर टी २० विश्वचषक खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेदरम्यान खेळपट्टी मंदावेल आणि फिरकीपटूंना मदत होईल.
टी२० विश्वचषकाला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रिकी पाँटिंगने धूडकावली भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर?
Photo: धोनीची टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियान एन्ट्री! बीसीसीआयने ‘किंग’ म्हणत केले ‘ग्रँड वेलकम’
युजवेंद्र चहलचं कारण आणि युवराज सिंगला अटक! पण रोहित शर्माचेही ‘प्रकरणात नाव’, वाचा अधिक