विशाखापट्टनम | भारत विरुद्ध विंडीज कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. य़ा सामन्यात आज विराट कोहलीने भारताकडून भारतासाठी वन-डेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी झेप घेतली.
त्याने या यादीत चौथ्या स्थानी असलेला भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले. विराटने भारताकडून वन-डेत २१३ सामन्यात ५८.८९च्या सरासरीने ९९५४ धावा केल्या आहेत. तर धोनीने ३२६ सामन्यात भारताकडून ५०.२४च्या सरासरीने ९९४९ धावा केल्या आहेत.
विराटची कारकिर्द २००८ ला तर धोनीची २००४ला सुरु झाली. परंतु संपुर्ण कारकिर्दीत विराटने वन-डेत प्रथमच धोनीला धावांच्या बाबतीत मागे टाकले आहे.
कसोटी आणि टी२० धावांमध्ये विराटने धोनीला यापुर्वीच मागे टाकले आहे. त्यामुळे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आता विराटने धोनीपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
भारताकडून वन-डेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
१८४२६-सचिन तेंडूलकर, सामने-४६२
१११२१-सौरव गांगुली, सामने-३०८
१०७८६-राहुल द्रविड, सामने-३४०
९९५४-विराट कोहली, सामने-२१३
९९४९-एमएस धोनी, सामने- ३२६#म #मराठी #INDvWI #TeamIndia @Maha_Sports @MarathiRT @MarathiBrain @kridajagat— Sharad Bodage (@SharadBodage) October 24, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–वयाच्या १५ वर्षी सचिनने जी ड्रेसिंगरुम शेअर केली तिथे ३० वर्षांनी करणार ही गोष्ट
–असे एक कारण ज्यामुळे युवराजचा २०१९ विश्वचषकातील पत्ता होणार कट