---Advertisement---

लाईव्ह सामन्यात कोहलीला सुचली मस्ती, इंग्लंडच्या खेळाडूला धावा बनवण्यासाठी दाखवला गॅप- VIDEO

---Advertisement---

केनिंग्टन ओव्हल कसोटीच्या पाचव्या दिवशीच्या खेळादरम्यान भारताच्या मजबूत स्थितीमुळे कर्णधार विराट कोहली खूप उत्साहित होता. याच कारणामुळे त्याने मैदानावर विरोधी संघाच्या ख्रिस वोक्सला चिथावण्यास सुरुवात देखील केली. विराट या इंग्लिश खेळाडूला गॅपमध्ये शॉट खेळायला सांगत त्यास डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हा किस्सा आहे इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यानचा. ७३ व्या षटकात वोक्स आणि जो रूट मैदानावर उभे होते. जॉनी बेयरस्टो आणि मोईन अली शून्यावर बाद झाल्यानंतर ख्रिस वोक्स नुकताच फलंदाजीला आला होता आणि दोन धावा करून तो खेळत होता. त्यानंतर पहिल्या स्लिपमध्ये उभा असलेला कर्णधार विराट कोहली पुढे आला आणि वोक्सला भडकावू लागला.

बाजूला असलेल्या ख्रिस वोक्सकडे बोट दाखवत विराट म्हणाला की, “इथे खूप जागा सोडली आहे. आपण इकडे शॉट्स खेळू शकता.” विराटचा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

https://twitter.com/nostalgic_soull/status/1434876018804756490?s=20

सामन्याच्या पाचव्या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडने १३१ धावांवर केवळ दोन विकेट गमावल्या होत्या. सामन्यातही, दोन्ही संघ बरोबरीतच होते. परंतु दुसऱ्या सत्रात जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी खेळ फिरवला. सर्वात आधी ६३ धावांवर खेळत असलेल्या हसीब हमीदला जडेजाने त्रिफळाचीत केले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने नवीन फलंदाज ओली पोपला त्रिफळाचीत केले. लवकरच बुमराहने जॉनी बेअरस्टोला शून्यावर बाद केले.

नवीन फलंदाज मोईन अलीला आपले खातेही उघडता आले नाही. त्याला अतिरिक्त खेळाडू सूर्यकुमार यादवच्या हाती रवींद्र जडेजाने झेलबाद केले. शार्दूल ठाकुरने इंग्लिश कर्णधार जो रूटला त्रिफळाचीत करून भारताच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होते आणि भारतीय संघ विजयी ठरला.

महत्त्वाच्या बातम्या-

पराभवानंतर रूटचा ऊहापोह; म्हणाला, ‘भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी रिव्हर्स स्विंगने आमचा घात केला’

‘बुमराह संघात असल्यास अश्विनची कोणाला गरज भासेल’, इंग्लंडच्या माजी क्रिकेटरचे लक्षवेधी विधान

‘विराटसेने’च्या ऐतिहासिक विजयानंतर एबीचे भन्नाट ट्वीट, टीकाकारांची बसली असेल ‘दातखिळी’!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---