भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या कसोटी सामन्यात विराटसेनेने अप्रतिम कामगिरी केली आणि सामना १५७ धावांनी जिंकला. आता पाचवा कसोटी सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघासाठी मोठी अडचण त्यांच्या मधल्या फळीची आहे. कसोटी संघातील भारतीय संघाचे तीन आधारस्तंभ चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांचा फलंदाजीचा विक्रम या मैदानावर अत्यंत खराब आहे.
विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या मैदानावर एक कसोटी सामना खेळला आहे. या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. त्याची सरासरी फक्त ३.५० आहे. त्याच्या बॅटमधून फक्त ७ धावा आल्या आहेत. पाचव्या कसोटीत कोहली शतक ठोकेल अशी अपेक्षा आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ त्याच्या बॅटमधून एकही शतक आलेले नाही. पण या मैदानावरचा त्याचा रेकॉर्ड पाहून असे वाटते की, कोहलीला पाचव्या कसोटीत शतक करणे कठीण आहे.
चेतेश्वर पुजारा
चेतेश्वर पुजाराची बॅट काही काळ शांत होती. पण गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तो फॉर्ममध्ये परतला आहे. मँचेस्टरच्या मैदानावरील पुजाराचा विक्रम पाहिला तर त्याची कामगिरी विशेष अशी राहिलेली नाही. त्याने या मैदानावर एक कसोटी सामना खेळला आहे. या कसोटी सामन्याच्या दोन्ही डाव मिळून, त्याच्या फलंदाजीतून फक्त १७ धावा आल्या आहेत. त्याची सरासरी ८.५० आहे.
अजिंक्य रहाणे
खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर विशेष काही करू शकलेला नाही. रहाणेने या मैदानावर खेळल्या गेलेल्या त्याच्या एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये फ्लॉप ठरला आहे. त्याच्या फलंदाजीतून केवळ २५ धावा आल्या आहेत. त्यात त्याची सरासरी १२.५० इतकी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहिच-पुजाराच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, ‘या’ विस्फोटक फलंदाजाला मिळू शकते कसोटी पदार्पणाची संधी
“बुमराहने मला डेल स्टेनची आठवण करून दिली”, केविन पीटरसन का म्हणाला असं, वाचा सविस्तर