---Advertisement---

विराट कोहलीचे 14 वर्ष जुने ट्विट व्हायरल! चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया; दुलीप ट्राॅफीशी खास संबंध?

On: मंगळवार, ऑगस्ट 13, 2024 10:53 AM
Virat Kohli
---Advertisement---

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे 14 वर्ष जुने ट्विट व्हायरल होत आहे. हे ट्विट दुलीप ट्रॉफीशी संबंधित आहे. वास्तविक, कोहली दीर्घ काळानंतर पुन्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार कोहली आणि कर्णधार रोहित शर्मासह अनेक स्टार खेळाडू आगामी दुलीप ट्रॉफीमध्ये खेळू शकतात. श्रीलंका दौरा संपल्यानंतर भारतीय खेळाडू 43 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीवर आहेत. भारताला आता पुढील मालिका बांग्लादेशविरुद्ध खेळायची आहे. जी 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन कसोटीशिवाय तीन टी-20 सामने होणार आहेत.

कोहलीने शेवटचा दुलीप ट्रॉफी 2010 मध्ये खेळला होता. त्यानंतर कोहलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (आता X) वर या संदर्भात एक छोटी पोस्ट शेअर केली. कोहलीने यामध्ये लिहिले होते की, “दुलीप ट्रॉफीसाठी मला शुभेच्छा द्या.” कोहली 14 वर्षांनंतर दुलीप ट्रॉफीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना ही पोस्ट पुन्हा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. कोहलीच्या जुन्या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले, “दुलीप ट्रॉफीमध्ये पुन्हा खेळण्यासाठी किंग कोहलीला शुभेच्छा.” दुसऱ्याने म्हटले, “दुलीप ट्रॉफीमध्ये कोहली फॉर्ममध्ये परतो.”

वास्तविक,  श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहलीची कामगिरी फारच निराशाजनक होती. तो कोणत्याही फॉर्ममध्ये दिसला नाही. त्याला तीन सामन्यांत केवळ 58 धावा करता आल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. एक सामना बरोबरीत सुटला. मात्र, कोहली दुलीप ट्रॉफीमध्ये खेळल्यास बांग्लादेश मालिकेपूर्वी फॉर्ममध्ये परतण्याची सुवर्णसंधी असेल. ही स्पर्धा 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, जी बीसीसीआयने अनंतपूरऐवजी बेंगळुरूमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीचे दोन सामने आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे होणार होते, परंतु आता लॉजिस्टिक समस्या टाळण्यासाठी त्यातील एक सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

हेही वाचा-

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला रडवलेली बॅट क्रिकेटमधून निवृत्त, पाहा कोणत्या क्रिकेटरची आहे ‘ती’ बॅट
मोठी बातमी! बीसीसीआय दिग्गज खेळाडूंची स्वतःची लीग सुरू करण्याची शक्यता, माजी क्रिकेटपटूंचा प्रस्ताव
‘पॅरिस ऑलिम्पिक’मधील सहभागी खेळाडू 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर, या विषयावर होणार मोंदीशी खास चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---