विशाखापट्टणम। आज(18 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दुसरा वनडे सामना होत आहे. हा सामना भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी(Virat Kohli) खास ठरला आहे. हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 400 वा सामना(400th International Match) आहे.
त्यामुळे 400 किंवा त्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो भारताचा 8 वा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडूलकर, एमएस धोनी, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, अनिल कुंबळे आणि युवराज सिंग या भारतीयांनी असा पराक्रम केला आहे.
विराटचा आजचा कारकिर्दीतील 241 वा वनडे सामना आहे. तर त्याने आत्तापर्यंत 84 कसोटी सामने खेळले आहेत. त्याचबरोबर त्याने 75 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. याबरोबरच विराटची या तीन्ही प्रकारात 50 पेक्षा जास्त सरासरी असून त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 21 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
आजच्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे भारतीय [Most International Matches(Indian)] –
664 सामने – सचिन तेंडूलकर
538 सामने – एमएस धोनी
509 सामने – राहुल द्रविड
433 सामने – मोहम्मद अझरुद्दीन
424 सामने – सौरव गांगुली
403 सामने – अनिल कुंबळे
402 सामने – युवराज सिंग
400 सामने – विराट कोहली






