कोलकाता। भारत विरुद्ध बांगलादेश संघात(India vs Bangladesh) कालपासून(22 नोव्हेंबर) सुरु झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात(Day-Night Test) भारताचा कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) शतकी खेळी केली आहे.
इडन गार्डनवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात खेळताना विराटने 194 चेंडूत 136 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 18 चौकार मारले. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 27 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 70 वे शतक आहे. या बरोबरच विराटने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
विराटने केले हे खास विक्रम –
#दिवस-रात्र कसोटीत शतक करणारा विराट पहिलाच भारतीय क्रिकेटपटू
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
100 शतके – सचिन तेंडूलकर
71 शतके – रिकी पॉटिंग
70 शतके – विराट कोहली
63 शतके – कुमार संगकारा
62 शतके – जॅक कॅलिस
#दिवस-रात्र कसोटीमध्ये शतके करणारे कर्णधार –
– फाफ डूप्लेसिस (दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2016)
– स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, 2016)
– जो रुट (इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज, 2017)
– केन विलियम्सन (न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, 2018)
– विराट कोहली (भारत विरुद्ध बांगलादेश, 2019)
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे कर्णधार –
41 – विराट कोहली
41 – रिकी पॉटिंग
33 – ग्रॅमी स्मिथ
20 – स्टिव्ह स्मिथ
#कसोटीत सर्वाधिक शतके करणारे कर्णधार –
25 शतके – ग्रॅमी स्मिथ
20 शतके – विराट कोहली
19 शतके – रिकी पॉटिंग
#सर्वात जलद 27 कसोटी शतके करणारे क्रिकेटपटू –
70 डाव – डॉन ब्रॅडमन
141 डाव – विराट कोहली
141 डाव – सचिन तेंडूलकर
154 डाव – सुनील गावस्कर
या कर्णधारांनी आत्तापर्यंत केले आहेत दिवस-रात्र कसोटीत शतके, विराटचाही झाला समावेश
वाचा👉https://t.co/yZjm8RZdyH👈#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) November 23, 2019
…आणि कर्णधार कोहलीने रिकी पॉंटींगच्या या विक्रमाला दिला धक्का!
वाचा👉https://t.co/jhqLUHU8hM👈#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) November 23, 2019