मोहाली| भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारी दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने सहज विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 150 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान 19 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.
भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 52 चेंडूत 72 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार 3 षटकार मारले. विराटचे हे आंतरराष्ट्रीय टी20मधील 22 वे अर्धशतक आहे. विराटच्या या खेळीमुळे त्याला सामनावीराचा देखील पुरस्कार देण्यात आला.
तसेच तो आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला आहे. त्याने आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 71 सामन्यात 50.85च्या सरासरीने 2441 धावा केल्या आहेत. याबरोबरच विराटने या सामन्यात काही खास विक्रम केले आहेत.
विराटने केले हे खास विक्रम –
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
2441 धावा – विराट कोहली (71 सामने)
2434 धावा – रोहित शर्मा (97 सामने)
2283 धावा – मार्टिन गप्टिल (78 सामने)
2263 धावा – शोएब मलिक (111 सामने)
2140 धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50+ धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू –
22 – विराट कोहली (71 सामने)
21 – रोहित शर्मा (97 सामने)
16 – मार्टिन गप्टिल (78 सामने)
15 – ख्रिस गेल (58 सामने)
15 – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)
#विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कसोटी, वनडे आणि टी20 प्रकारात प्रत्येकी 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची सरासरीने असणारा सध्याचा एकमेव क्रिकेटपटू आहे.
विराटची सरासरी –
कसोटी – 53.14
वनडे – 60.31
टी20 – 50.85
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारे क्रिकेटपटू –
12 – मोहम्मद नबी
11 – विराट कोहली
11 – शाहिद आफ्रिदी
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 30+ धावा करणारे क्रिकेटपटू –
33 – मार्टिन गप्टिल
32 – विराट कोहली
31 – जेपी ड्यूमिनी
#विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात विजय मिळवणारा पहिला भारतीय कर्णधार.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–व्हिडिओ: विराट कोहली, रविंद्र जडेजाने घेतलेले हे जबरदस्त झेल पाहिले का?
–विराट कोहलीने रोहित शर्माच्या एक नाही तर दोन विश्वविक्रमांना दिला धक्का…
–विनेश फोगटने जिंकले कांस्यपदक; टोकियो ऑलिंपिकसाठीही ठरली पात्र