मँचेस्टर। आज(16 जून) 2019 विश्वचषकातील 22 वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडणार आहे. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक खास विश्वविक्रम करण्याची संधी आहे.
विराटने आजच्या सामन्यात 57 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो वनडे क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पार करेल. तसेच वनडेमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पार करणारा तो जगातील 9 वा तर भारताचा तिसरा क्रिकेटपटू ठरेल. भारताकडून वनडेत 11 हजार धावा सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीने केल्या आहेत.
याबरोबरच विराट सर्वात जलद 11 हजार वनडे धावा करणाराही फलंदाज ठरेल. सध्या वनडेत सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. त्याने 276 डावात 11 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
विराटने सध्या वनडेमध्ये 229 सामन्यातील 221 डावात 59.47 च्या सरासरीने 10943 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटने जर आज वनडेत 11 हजार धावांचा टप्पा पार केला तर तो सचिनपेक्षा हा टप्पा गाठण्यासाठी तब्बल 54 डाव कमी खेळलेला असेल.
वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
18426 धावा – सचिन तेंडुलकर
11363 धावा – सौरव गांगुली
10943 धावा – विराट कोहली
10889 धावा – राहुल द्रविड
10561 धावा – एमएस धोनी
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वॉर्नरने त्याच्यामुळे दुखापतग्रस्त झालेल्या या गोलंदाजाला दिली खास भेट, पहा व्हिडिओ
–चाचा शिकागो यांनी मानले एमएस धोनीचे आभार, जाणून घ्या कारण
–विश्वचषक २०१९: श्रीलंका संघाने केले गंभीर आरोप, आयसीसीकडे केली तक्रार






