मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. या डावात बुमराहनं 4 आणि सिराजनं 3 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजनं चौथ्या दिवशी पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या स्टीव्ह स्मिथची विकेट घेतली. सिराजनं स्मिथला अतिशय आश्चर्यकारक पद्धतीनं बाद केले. त्यामागे ‘मास्टरमाइंड’ विराट कोहलीचा हात होता!
वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला स्टीव्ह स्मिथला गोलंदाजी कशी करायची ते सांगतोय. सिराज कोहलीचं म्हणणं ऐकतो आणि त्याला लगेच स्मिथची विकेट मिळते.
व्हिडिओमध्ये कोहली सिराजला मोठ्या आवाजात म्हणतो, “कोपऱ्यातून, कोपऱ्यातून… प्रत्येक बॉल कोपऱ्यातून. त्याला कोपऱ्यातून आवडत नाही.” कोहलीच्या सल्ल्यानुसार सिराजनं स्मिथला ऑफ स्टंपवर यॉर्कर लेन्थवर चेंडू टाकला. स्मिथ या चेंडूवर शॉट मारण्याच्या प्रयत्नात कीपरच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानं 1 चौकाराच्या मदतीनं 13 धावा केल्या. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
SIRAJ 🤝 KOHLI….!!!!
– Smith gone & game opened for India at MCG. pic.twitter.com/W1UcNaCWuv
— Johns. (@CricCrazyJohns) December 29, 2024
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली. कांगारू संघानं पहिल्या डावात सर्वबाद 474 धावा केल्या. यादरम्यान स्टीव्ह स्मिथनं संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानं 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 140 धावा केल्या. याशिवाय सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन यांनी अर्धशतकं झळकावली. या काळात जसप्रीत बुमराहनं टीम इंडियासाठी सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजानं 3, आकाशदीपनं 2 आणि वॉशिंग्टन सुंदरनं 1 बळी घेतला.
हेही वाचा –
भारताच्या विजयाला ‘ग्रहण’, ऑस्ट्रेलियाची आघाडी 300 पार; अखेरच्या सत्रात बुमराह-सिराजची मेहनत वाया
“मी सिलेक्टर असतो तर रोहितला नारळ दिला असता”, दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीदरम्यान यष्टिरक्षक फलंदाज जखमी, संपूर्ण मालिकेतून बाहेर