---Advertisement---

कॅप्टन कोहलीचा नाद खूळा! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार

On: रविवार, नोव्हेंबर 24, 2019 6:24 PM
---Advertisement---

कोलकाता। भारताने बांगलादेश विरुद्ध इडन गार्डनवर झालेल्या दिवस-रात्र कसोटीत आज एक डाव 46 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.

भारताचा हा कसोटी क्रिकेटमधील सलग 7 वा विजय होता. त्यामुळे भारताने पहिल्यांदाच सलग 7 कसोटी विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे.

तसेच कर्णधार म्हणून सलग 7 कसोटी विजय मिळवणारा विराट पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी कोणत्याही भारतीय कर्णधाराला सलग 7 कसोटी विजय मिळवता आले नव्हते.

भारताने ऑगस्ट 2019 पासून आत्तापर्यंत हे 7 कसोटी विजय मिळवले आहेत. यामध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या 2 विजयांचा, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 विजयांचा आणि बांगलादेश विरुद्ध मिळवलेल्या 2 विजयांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---