भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना मागील महिन्यात ११ जानेवारीला कन्यारत्न प्राप्त झाले. तेव्हापासून त्यांच्या या लाडक्या लेकीची चर्चा सातत्याने होत आहे. अनेक जण तिची पहिली झलक पाहाण्यासाठी आतुर आहेत.
अखेर अनुष्का शर्माने सोशल मीडियावर तिचा विराट आणि नवजात लेकीसह फोटो पोस्ट केला आहे. तसेच तिने त्यांच्या या मुलीचे नाव ‘वामिका’ असे ठेवले असल्याचे सांगितले आहे.
अनुष्काने शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘आम्ही प्रेमाणे, आनंदाने आणि कृतज्ञ भावनेने एकत्र राहात होतो, पण या लहानग्या वामिकाने हे आमचे आयुष्य संपूर्ण वेगळ्या स्तरावर नेले आहे. अश्रू, हसू, काळजी, आनंद या सर्व भावना कधीकधी काही मिनिटांच्या कालावधीत अनुभवायला मिळत आहेत.’
We have lived together with love , presence and gratitude as a way of life but this little one , Vamika ❤️ has taken it to a whole new level !
Tears , laughter , worry , bliss – emotions that have been experienced in a span of minutes sometimes ! pic.twitter.com/pOe2GQ6Vxi— Anushka Sharma (@AnushkaSharma) February 1, 2021
विराटने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती मुलगी झाल्याची गोड बातमी –
विराटने त्याच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करुन देताना लिहिले होते की, ‘आम्हाला सोमवारी(११ जानेवारी) दुपारी मुलगी झाली आहे. आम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाचे आणि शुभेच्छांबद्दल आभार मानतो. अनुष्का आणि बाळाचे आरोग्य उत्तम आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील या नवीन पर्वाची सुरुवात करण्यास उत्सुक असून आमच्या खासगी जीवनाचा आदर राखला जाईल अशी अपेक्षा करतो.’
विराटने घेतली होती पालकत्व रजा –
विराटने मागीवर्षाच्या अखेरीस आपल्या बाळाचे आगमन होणार असल्याने पालकत्व रजा बीसीसीआयकडून मंजूर करुन घेतली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे, टी२० मालिका आणि कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळून भारतात परतला होता. त्याने म्हटले होते की त्याला त्याच्या आयुष्यातील या सुंदर क्षणांचा साक्षीदार व्हायचे आहे. या क्षणांना तो गमावू इच्छित नाही.
मुलीच्या जन्मानंतर १५ दिवसांनी भारतीय संघात सामील –
विराट सध्या चेन्नईमध्ये आहे. ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिले २ सामने चेन्नईत होणार असल्याने दोन्ही संघ मागील आठवड्यातच चेन्नईला पोहचले आहेत. विराटही २७ जानेवारीला पालकत्व रजा संपल्यानंतर चेन्नई येथे पोहचला आहे.
विराट-अनुष्काचे इटलीमध्ये झाले लग्न –
विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये १० डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी त्यांच्या लग्नसोहळ्यात जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवास सहभागी झाला होता.
विरुष्काच्या मुलीचे नाव महाराज अनंत बाबा ठेवणार, अशी होती चर्चा
काही दिवसांपूर्वी आलेल्या माध्यमांतील काही वृत्तांनुसार, विराट आणि अनुष्काच्या मुलीचे नाव त्यांच्या कुटुंबातील कोणती व्यक्ती ठेवणार नसून महाराज अनंत बाबा ठेवणार आहेत, अशी चर्चा होती. विराट आणि अनुष्का यांची महाराज अनंत बाबा यांच्यावर खूप श्रद्धा आहे. त्यांनी लग्न करणे, घर खरेदी करणे अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत निर्णय घेण्यापुर्वी महाराज अनंत बाबा यांचा सल्ला घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतर तिचे नाव ठेवण्याची जबाबदारी महाराज अनंत बाबाच पार पाडतील, असे म्हटले जात होते.
महत्त्वाच्या बातम्या –
कोलकाता ते कानपुर व्हाया मद्रास, तब्बल ३६ वर्षांपासून कायम आहे अझरुद्दीन यांचा ‘हा’ विश्वविक्रम
कोलकाता ते कानपुर व्हाया मद्रास, तब्बल ३६ वर्षांपासून कायम आहे अझरुद्दीन यांचा ‘हा’ विश्वविक्रम
अबब! लिओनेल मेस्सीला बार्सिलोनाच्या करारातून मिळणारी किंमत ऐकून व्हाल थक्क