---Advertisement---

विराट कोहली बनला ‘बाप’माणुस; अनुष्काने दिला गोंडस मुलीला जन्म

On: सोमवार, जानेवारी 11, 2021 4:20 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना सोमवारी(११ जानेवारी) कन्यारत्न प्राप्त झाले आहे. अनुष्काला सोमवारी मुंबईतील ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिची डिलिव्हरी झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याबद्दल विराट कोहलीने सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे.

त्याने म्हटले आहे की ‘आम्हाला सोमवारी दुपारी मुलगी झाली आहे. आम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाचे आणि शुभेच्छांबद्दल आभार मानतो. अनुष्का आणि बाळाचे आरोग्य उत्तम आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील या नवीन पर्वाची सुरुवात करण्यास उत्सुक असून आमच्या खाजगी जीवनाचा आदर राखला जाईव अशी अपेक्षा करतो.’

विराटने घेतली पालकत्व रजा – 

विराटने काही दिवसांपूर्वीच आपल्या बाळाचे आगमन होणार असल्याने पालकत्व रजा बीसीसीआयकडून मंजूर करुन घेतली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे, टी२० मालिका आणि कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळून भारतात परतला होता. सध्या तो अनुष्काबरोबर असून त्याने म्हटले होते की त्याला त्याच्या आयुष्यातील या सुंदर क्षणांचा साक्षीदार व्हायचे आहे. या क्षणांना तो गमावू इच्छित नाही.

काही महिन्यांपूर्वी दिली होती गोड बातमी –

विराट आणि अनुष्काने ऑगस्ट २०२० मध्ये सर्वांना नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते की जानेवारी २०२१ मध्ये ते दोघेही पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत.

इटलीमध्ये झाले लग्न – 

विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये १० डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी त्यांच्या लग्नसोहळ्यात जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवास सहभागी झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---