भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे दोघेही सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद लूटत आहेत. स्वित्झर्लंडमध्ये बर्फाने भरलेल्या पर्वतांमध्ये आनंद लूटत असताना अनुष्काने आणि विराटने त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे. परंतु, या फोटोमध्ये विराट आणि अनुष्काबरोबर अजून एक जोडपं दिसत आहे. या फोटोमध्ये बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल (Natasha Dalal) दिसत आहेत.
हा फोटो शेअर करताना अनुष्काने कॅप्शन दिले आहे की, “हॅलो मित्रांनो वरूण धवन, नताशा दलाल.” यापूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये सुट्टीवर जाताना विराटने आपण कुठे जाणार आहोत याची माहिती दिली नव्हती. परंतु, आता अनुष्काने ही माहिती तिच्या पोस्टमधून दिली आहे.
https://www.instagram.com/p/B6qsblsphi5/?utm_source=ig_web_copy_link
विराट आणि अनुष्का हे दोघे स्वित्झर्लंडमधील गिस्ताद येथे असल्याचे अनुष्काने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसते आहे.
अनुष्काच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अनेक कमेंट केल्या आहेत.
अनुष्काने शेअर केलेली पोस्ट रिपोस्ट करताना धवनने विराट आणि अनुष्काला ‘पर्वतांचे मित्र’ असे म्हटले आहे.
चार आयपीएल जिंकणाऱ्या षटकार किंग रोहित शर्माला या संघातून डावलले
वाचा????https://t.co/YQT5LobsPl????#म #मराठी #Cricket #TeamIndia @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) December 30, 2019




