भारत विरुद्ध इंग्लंड संघात अहमदाबाद येथे आजपासून (०४ मार्च) चौथा आणि अखेरचा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा निकाल इंग्लंडच्या बाजूने लागल्याने ते प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरले आहेत. परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांचा निर्णय चुकीचा ठरवत पहिल्या १३ षटकातच ३ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा फलंदाज बेन स्टोक्स यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसून आले.
त्याचे झाले असे की, इंग्लंडचा संघनायक जो रूट बाद झाल्यानंतर स्टोक्स पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. अशात विराटने डावातील १५ वे षटक युवा गोलंदाज मोहम्मद सिराजकडे सोपवले. सिराजने त्याच्या षटकातील पहिलाच चेंडू अतिशय वेगाने टाकला, ज्यावर स्टोक्सला शॉट मारता आला नाही. पंचांनी तो चेंडू नो बॉल असल्याचेही घोषित केले.
यावेळी सिराज तोंडातल्या तोंडात स्टोक्सकडे पाहून काही तरी म्हणाला. हे बघताच स्टोक्सचाही पारा चढला. परंतु स्टोक्स जाऊन सिराजला काही म्हणण्याआधी विराट सिराजच्या बचावासाठी धावला. यामुळे विराट आणि स्टोक्समध्ये शाब्दिक युद्ध पेटले. काही वेळ त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर पंच नितीन मेनन यांनी मध्यस्थी करत त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1367345112510992385?s=20
https://twitter.com/Trollmama3/status/1367344445729873921?s=20
https://twitter.com/Vamsivardhan_/status/1367344566429388804?s=20
#INDvsENG #ViratKohli#benstokes @CricCrazyJohnshttps://t.co/J9DGFNmfCh
— 𝑺𝒂𝒕𝒛 🇮🇳 (@satzcricket) March 4, 2021
विराट आणि स्टोक्समधील शाब्दिक युद्ध रंगले असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चेत आहे. अनेकांनी कर्णधार विराट नेहमीच आपल्या संघ-सहकाऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेत असल्याचे सांगत त्याचे कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पोलार्ड बनला ‘सिक्सर किंग’, एका षटकात मारले सलग ६ षटकार; व्हिडिओ पाहून आठवेल युवराज
वातावरण बदलाचा पाहुण्यांना धक्का; इंग्लंड संघाच्या कोचसह खेळाडूंच्या प्रकृतीत बिघाड