---Advertisement---

एकाची फलंदाजी तर दुसऱ्याची गोलंदाजी, पुणे वनडेत ‘हे’ दोन शिलेदार इंग्लंडसाठी कर्दनकाळ

On: मंगळवार, मार्च 23, 2021 10:40 AM
---Advertisement---

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून उभय संघांनी कसोटी आणि टी२० मालिकेचा टप्पा पूर्ण केला आहे. यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे मंगळवार रोजी (२३ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान पहिला वनडे सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता या सामन्याची सुरुवात होणार आहे.

फलंदाजी आणि गोलंदाजीस पोषख असलेल्या पुण्याच्या या मैदानावर याआधी काही भारतीय खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाची छाप सोडली आहे. त्यामुळे पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडपुढे त्या खेळाडूंना रोखण्याचे आव्हान असणार आहे.

पुण्यात विराटने घातलाय धावांचा रतीब
पुणे स्टेडियमवर भारताचा कर्णधार विराट कोहली याने प्रतिस्पर्धी संघांना धू धू धुतले आहे. या मैदानावर विराटने आतापर्यंत ४ वनडे सामने खेळले असून सर्वाधिक ३१९ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने २ शतके आणि १ अर्धशतक केले आहे. यावेळी त्याची फलंदाजी सरासरी जवळपास ८० इतकी राहिली आहे. त्याने याच मैदानावर इंग्लंडविरुद्ध १ वनडे सामना खेळताना शतक झळकावले होते. यावेळी त्याने १०५ चेंडूत त्याने १२२ धावांची खेळी केली होती.

पुण्यात भुवनेश्वरची गोलंदाजी राहिलीय अप्रतिम
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या चेंडूला पुणे स्टेडियमवर चांगली गती मिळते. त्याने या मैदानावर ३ वनडे सामने खेळताना ४ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान ४५ धावा देत ३ विकेट्स घेणे, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. त्याच्याव्यतिरिक्त युझवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्या यांनीही येथे प्रत्येकी ३ विकेट्स चटाकवल्या आहेत.

पुणे स्टेडियवर भारताचे पारडे जड
जर सामन्याविषयी बोलायचे झाले, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पुणे येथे आतापर्यंत फक्त एक वनडे सामना झाला आहे. २०१७ मध्ये झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडवर ३ विकेट्सने मात केली होती. तर इंग्लंडसह इतर प्रतिस्पर्धी संघांसह एकूण ४ वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी २ सामन्यात भारताला विजय तर २ सामन्यात पराजयाचा सामना करावा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आज पुण्यात रंगणार भारत-इंग्लंड वनडेचा थरार; रोहित, विराटसह ‘हे’ खेळाडू घालणार विक्रमांचा रतीब

“सूर्यकुमार यादवला वनडेत संधी देण्यासाठी वाटेल ते करण्यास तयार”

सुपरमॅन सिराज! हवेत उंच उडी मारत टिपला नेत्रदिपक झेल; बीसीसीआय म्हणते, ‘हा कोणता पक्षी की विमान?’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---