---Advertisement---

सुपरमॅन सिराज! हवेत उंच उडी मारत टिपला नेत्रदिपक झेल; बीसीसीआय म्हणते, ‘हा कोणता पक्षी की विमान?’

On: मंगळवार, मार्च 23, 2021 8:44 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला पुणे येथे आजपासून (२३ मार्च) प्रारंभ होणार आहे. टी-२० मालिकेत इंग्लंड संघाला पराभूत केल्यानंतर भारतीय संघासमोर वनडे मालिका जिंकण्याचे आव्हान असणार आहे. भारतीय संघाचे २१ मार्च रोजी पुण्यात आगमन झाले आहे. त्यानंतर भारतीय संघाने सरावाला देखील सुरुवात केली आहे. अशातच बीसीसाआयने आपल्या ट्विटर हॅन्डलवर मोहम्मद सिराजचा मैदानात सराव करत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

या मालिकेतील तीनही सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर २३, २६ आणि २८ मार्चला खेळवण्यात येणार आहे. अशातच पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाने सोमवारी सरावास केली आहे. सराव करत असतानाचा एक व्हिडिओ बीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये सिराज उंच उडी मारून हवेत झेल टिपताना दिसून येत आहे.

यावर बीसीसीआयने कॅप्शन देत लिहिले आहे, “हा कोणता पक्षी आहे की कोणते विमान आहे? हा उडणारा मोहम्मद सिराज आहे.” या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रचंड शेअर केले जात आहे.

वनडे मालिकेत भारतीय संघ इंग्लंड संघासोबत ३ सामने खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचे पारडे जड असणार आहे. इंग्लंड संघाने यापूर्वी भारतात, भारतीय संघाविरुद्ध एकूण ४८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात अवघ्या १६ सामन्यात इंग्लंड संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ३१ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. यातील एक सामना अनिर्णित राहिला होता.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर

महत्त्वाच्या बातम्या-

वनडे मालिकेपुर्वी श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, इंग्लंडकडून खेळणार क्रिकेट; वाचा कारण

‘कॅप्टनकूल’ धोनी झालाय दुकानदार, रांची शहरात थाटलंय ‘या’ गोष्टीच दुकान

क्रिकेटसाठी काय पण! दुखापत झाली असतानाही पायावर पट्टी बांधून सचिनने खेळली फायनल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---