गुरुवारी (दि. १९ मे) आयपीएल २०२२मधील ६७वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. या सामन्यात बेंगलोर संघाने ८ विकेट्सने सामना जिंकत प्लेऑफमधील अपेक्षा जिवंत ठेवल्या. या सामन्यात विराट कोहली आपल्या जुन्या अंदाजात दिसला. विराटची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली. त्याने अवघ्या ५४ चेंडूत ७३ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ८ चौकार लगावले. आपल्या डावादरम्यान त्याने विराट गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला स्लेज करताना दिसला.
हार्दिक पंड्या आणि विराट कोहलीमध्ये बाचाबाची
खरं तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाच्या डावावेळी चौथे षटक गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टाकण्यासाठी आला होता. यावेळी क्रीझवर विराट कोहली (Virat Kohli) उपस्थित होता. पंड्याच्या या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर विराटने सलग दोन चौकार मारले. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर पंड्या आणि विराटमध्ये बाचाबाची झाली.
पंड्या आणि विराटमध्ये तापले वातावरण
पंड्याने यानंतर चौथ्या षटकातील तिसरा चेंडू विराटच्या शरीरावर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, विराटने या चेंडूवर जबरदस्त फटका मारला. विराट या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, चेंडू तिथे उपस्थित असलेल्या राशिद खानला अडवता न आल्याने चौकाराच्या दिशेने गेला.
तोंड लपवताना दिसला पंड्या
यावेळी चौकार मारल्यानंतर विराटने पंड्याला पाहून आक्रमक पद्धतीने इशारा करण्यास सुरुवात केली. विराटची आक्रमकता पाहून पंड्या तोंड लपवताना दिसला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याव्यतिरिक्त चाहतेही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Go, go, go, GO BACK! 👊#ViratKohli𓃵 @imVkohli #RCBvGT pic.twitter.com/uQm2xhiyum
— Sushant Mehta (@SushantNMehta) May 19, 2022
looks like there is something off between virat and hardik
— Nikhil (@Attitudist) May 19, 2022
All the ego stares and swearing between Virat Kohli and Hardik Pandya today is totally unnecessary.#GTvRCB #TATAIPL
— PK (@iPkoppula) May 19, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विराटचा खास पराक्रम
गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहलीने खास पराक्रम केला. तो टी२० क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी ७००० धावांचा टप्पा पार करणारा खेळाडू बनला. बेंगलोरकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराटनंतर एबी डिविलियर्स, ख्रिस गेल, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांचा क्रमांक लागतो. डिविलियर्सने ४५२२ धावा, गेलने ३४२० धावा, कॅलिसने १२७१ धावा आणि द्रविडने ११३२ धावा केल्या आहेत.
फॉर्म गेल्यानंतरही तोच काळ सर्वात आनंदी असल्याचं म्हणतोय विराट, वाचा कारण
रिकी पॉटिंगने दिलेला शब्द पाळला आणि आवेश खान आयपीएल स्टार झाला