वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा समारोप झाला आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. या स्पर्धेत भारताचा विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तसेच स्पर्धेचा मानकरी म्हणून देखील त्याला पुरस्कार देण्यात आला. या सर्व गोष्टी घडत असतानाच, आता त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Virat Kohli and his long standing manager Bunty Sajdeh part ways. Virat Kohli will float his own company very soon. (To News18) pic.twitter.com/f30FycD7us
— Tanuj Singh (@ImTanujSingh) November 20, 2023
विश्वचषकात पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विराटने मागील दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून त्याचा मॅनेजर असलेल्या बंटी सजदेह याच्याशी असलेले व्यावसायिक संबंध तोडले आहेत. विराट लवकरच स्वतःची मॅनेजमेंट कंपनी सुरू करणार असून त्याबाबतच्या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. बंटी हा कॉर्नरस्टोन या सेलिब्रिटींचे मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीचा संस्थापक आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक करण जोहर याची धर्मा प्रोडक्शन ही फर्म देखील या कंपनीमध्ये गुंतवणूक करते.
विराट व बंटी हे दोघे जवळचे मित्र म्हणून देखील ओळखले जात होते. विराटला अनेक मोठे करार मिळवून देण्यात बंटी याचा महत्त्वाचा वाटा होता. प्युमा, एमआरएफ व अमेरिकन टूरिस्टर यांच्यासारखे मोठे आंतरराष्ट्रीय ब्रँड बंटी यांनीच आणलेले सांगितले जाते. मात्र आता विराटने त्याला इंस्टाग्रामवरून अनफॉलो देखील केले आहे.
कॉर्नरस्टोन विराट व्यतिरिक्त कुलदीप यादव, उमेश यादव या भारतीय क्रिकेटपटून व्यतिरिक्त पी व्ही सिंधू सानिया मिर्झा यासारख्या क्रीडापटूंसाठी काम करते. तसेच बॉलीवूडमधील सारा अली खान, जानवी कपूर व टायगर श्रॉफ असे सेलिब्रिटी त्यांच्याशी करारबद्ध आहेत.
(Virat Kohli And Manager Bunty Sajdeh Part Away After 10 Years)
हेही वाचा-
World Cup Final मध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचे पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन, ड्रेसिंग रूममध्ये पोहचून…
World Cup गमावला तरी ICC ने केला रोहितचा सन्मान, इतर 5 भारतीयांनाही मिळाले मानाचे स्थान, वाचा सविस्तर