---Advertisement---

तयारी आयपीएलची! क्वारंटाईन पूर्ण करत विराट-सिराज परतले मैदानात, संघासह सरावास सुरुवात, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यावरून आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे दोघेही यूएईत दाखल झाले होते. कोरोनाच्या नियमांप्रमाणे तेथे त्यांना सहा दिवसांच्या विलगीकरणात ठेवले गेले होते. दरम्यान विराट आणि सिराज यांना त्यांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला असून दोघेही संघासोबत सराव सत्रात सामील झाले होते.

विराट आणि सिराज यांना इंग्लंमधून यूएईला आणण्यासाठी आरसीबीने चार्टर्ड विमानाचे नियोजन केले होते आणि ते दोघे १२ सप्टेंबरला यूएईमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर हे दोघेही विलगीकरणात होते. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी १७ सप्टेंबर रोजी पूर्ण झाला.

विराट आणि सिराज संघासोबत सराव सत्रात सामील झाल्याची माहिती देत आरसीबीने त्यांच्या ट्वीटर हॅंडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओसोबर लिहिले आहे की, “बोल्ड डायरीज : कोहली विलगीकरण कालावधी पूर्ण करून संघासोबत सामील झाला. येथे संघाच्या कॅंपमध्ये आनंद आहे. कारण कोहली, सिराज आणि आमचे काही विदेशी खेळाडू पहिल्या नेटमधील सरावामध्ये सामील झाले आहेत.”

व्हिडिओत दिसत आहे विराट आणि अन्य काही खेळाडू, ज्यांनी त्यांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे, ते त्यांचे क्रिकेट किट घेऊन मैदानात येत आहेत. मैदानात एबी डिव्हिलिअर्ससह अन्य खेळाडू आणि प्रशिक्षक त्याच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात आरसीबी त्यांचा पहिला सामना २० सप्टेंबरला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध दुबईमध्ये खेळणार आहे.

संघासोबत सामील झाल्यावर सिराजने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. तो व्हिडिओत म्हणतो, “सर्व फलंदाज चांगल्या फार्ममध्ये दिसत आहेत. हे संघासाठी चांगले आहे की, ग्लेन मॅक्सवेल, कोहली भाई आणि डिव्हिलिअर्स सर सर्व चांगल्या फार्ममध्ये आहेत.”

आरसीबीचे क्रिकेट ऑपरेशन निर्देशक आणि प्रशिक्षक माइक हेसन यांनी सांगितले की, “कर्णधारासोबत दुरून रणनीतीवर चर्चा करण्याऐवजी समोरा समोर असणे नेहमीच चांगले असते. सहा दिवसांच्या विलगीकरणाने कोहलीला फ्रेश होण्याची संधी मिळाली आहे. आता आम्ही सर्व एकाच पातळीवर आहोत हे सुनिश्चित करण्यावर काम करत आहोत.”

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंकेच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटरने बीसीसीआय दिलेली प्रशिक्षक पदाची ऑफर धुडकावली

विश्वचषकासाठी संघ निवडताना राहुल द्रविडची मदत घेणार निवड समितीचे नवीन चेअरमन, ‘हे’ आहे कारण

जेव्हा केवळ २ धावांवर बाद होऊनही गांगुलीने जिंकलेला ‘सामनावीर’ पुरस्कार, पाकिस्तानची उडवली होती झोप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---