इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकातून भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर काही दिवसांपूर्वी दुखापतीमुळे बाहेर पडला. त्याच्या डावा पायाच्या अंगठ्याला नेटमध्ये सराव करताना जसप्रीत बुमराहच्या यॉर्कर बॉल लागल्याने दुखापत झाली होती.
तो या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडल्याने त्याचा बदली खेळाडू म्हणून 28 वर्षीय सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालला भारतीय संघात संधी देण्यात आली.
अगरवालची भारतीय संघात झालेल्या या निवडीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने अजून भारताकडून एकही वनडे सामना खेळलेला नाही. तरीही अंबाती रायडू, अजिंक्य रहाणे, मनिष पांडे अशा खेळाडूंना डावलून अगरवालची निवड झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
पण अगरवालला संघात संधी देण्याचा निर्णय 5 सदस्ययी निवड समीतीऐवजी भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला असल्याचे आयएएनएसने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
आयएएनएसला एका सुत्राने माहिती दिली आहे की ‘संघ व्यवस्थापननाने स्पष्ट केले होते की दुखापतग्रस्त शंकर ऐवजी अगरवालला संधी देण्याची त्यांची इच्छा आहे. यावर निवड समीतीने चर्चा करण्याचा प्रश्नच नव्हता.’
‘जर तूम्ही पाहिले तर अगरवालने भारत अ संघाकडून वनडे मालिकेत चार डावात 2 शतकांसह 287 धावा केल्या होत्या. लेस्टरशायर विरुद्ध सराव सामन्यात त्याने केलेल्या 151 धावांच्या खेळीला तूम्ही विसरु शकत नाही. ती मालिकाही जून आणि जूलैमध्ये(2018) झाली होती.साधारण विचार असा आहे की तो वैविध्यपूर्ण आहे आणि खेळाला चांगले समजून घेतो.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यानंतर अशी झाली आहेत सेमीफायनलची समीकरणे
–पृथ्वी शॉ विंडीज दौऱ्यातून बाहेर; या तीन खेळाडूंना मिळाली संघात संधी
–शाकिब अल हसनने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा पहिलाच क्रिकेटपटू