---Advertisement---

व्हिडिओ: विराट कोहली, रविंद्र जडेजाने घेतलेले हे जबरदस्त झेल पाहिले का?

---Advertisement---

मोहाली। बुधवारी(18 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने सहज विजय मिळत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात भारताच्या कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाकडून क्षेत्ररक्षण पहायला मिळाले. या दोघांनीही या सामन्यात जबरदस्त झेल घेतले.

विराटने क्षेत्ररक्षण करताना 12व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटॉन डीकॉकचा एकहाती शानदार झेल घेतला. नवदीप सैनीने गोलंदाजी केलेल्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डीकॉकने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

पण मिडऑफला उभ्या असणाऱ्या विराटने पळत येत उडी मारून डाव्या हाताने झेल घेतला. त्यामुळे डीकॉक 52 धावांची अर्धशतकी खेळी करुन बाद झाला.

त्यानंतर काही वेळात 13व्या षटकात जडेजाने गोलंदाजी करताना स्वत:च्याच गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या रस्सी वॅन दर ड्यूसनचा झेल घेतला. जडेजाने या षटकातील टाकलेला पहिलाच चेंडू ड्यूसनने फटकावल्यानंतर जडेजाने चपळाईने वर उडीमारत तो चेंडू झेलला.

त्यामुळे डयूसन 1 धाव करुन बाद झाला. यांनतरही जडेजाने तेंबा बाऊमाचा दीपक चहरच्या गोलंदाजीवर दुसरा झेल घेतला.

विराट आणि जडेजाच्या या अफलातून झेलांचे व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केले आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1174340925645918209

https://twitter.com/BCCI/status/1174332964592701445

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 149 धावा केल्या होत्या आणि भारतासमोर विजयासाठी 150 धावांचे आव्हान ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेकडून डीकॉकने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तसेच तेंबा बाउमाने 49 धावांची खेळी केली.

भारताकडून दीपक चाहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजा, नवदीप सैनी आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.

त्यानंतर 150 धावांचे आव्हान भारताने 19 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून कर्णधार विराटने 72 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तसेच त्याने शिखर धवनबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची महत्तपूर्ण भागीदारी रचली. शिखरने 40 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून अँडील फेहलूक्वायो, कागिसो रबाडा आणि बीजॉर्न फॉर्च्यूनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

https://twitter.com/sumitsamhaLega/status/1174328847015133185

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट कोहलीने रोहित शर्माच्या एक नाही तर दोन विश्वविक्रमांना दिला धक्का…

विनेश फोगटने जिंकले कांस्यपदक; टोकियो ऑलिंपिकसाठीही ठरली पात्र

कोहली-स्मिथ कोण आहे सर्वोत्तम फलंदाज? जॉन्टी ऱ्होड्सने घेतले ‘हे’ नाव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment