भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.तो फलंदाजी करत असो किंवा क्षेत्ररक्षण तो नेहमीच आक्रमक दिसून येतो. परंतु, इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवशी (१६ ऑगस्ट ) विराट कोहली मजेशीर कृत्य करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी (१६ ऑगस्ट) भारतीय संघाचे वर्चस्व दिसून आले. दरम्यान, इंग्लंड संघ २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना एका क्षणी भारतीय संघाचा कर्णधार यष्टीमागे राहून रिषभ पंत सोबत मजेशीर कृत्य करताना दिसून आला.
तर झाले असे की, इंग्लडचे सलामीवीर फलंदाज डोम सिब्ले आणि रॉरी बर्न्स लवकर माघारी परतल्यानंतर इंग्लंड संघातील फलंदाज दबावात आले होते. त्यानंतर जो रूट आणि जॉनी बेअरस्टो डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी २० व्या षटकात विराट कोहलीने रिषभ पंतच्या कानात ब्रॅसलेट टाकले होते. हे मजेशीर कृत्य पाहून चाहत्यांनी देखील मजेशीर प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे.(Virat Kohli and rishabh pant funny video went viral on social media)
https://twitter.com/tyrion_jon/status/1427278548515975172
https://twitter.com/EdhukkuM/status/1427279655392866315?s=19
https://twitter.com/CricCrazyAlok/status/1427278008646213643
https://twitter.com/ViratkohliFabb2/status/1427277326753009665
भारतीय गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिल्यानंतर गोलंदाजीमध्येही संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. २७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिला. त्याने रॉरी बर्न्सला भोपळाही न फोडता माघारी धाडले होते. तसेच डोम सिब्लेला देखील मोहम्मद शमीने ० धावांवर माघारी धाडले होते.
त्यानंतर कर्णधार जो रूटने हमीद सोबत मिळून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु ही जोडी ही फार काळ टिकू शकली नाही. ईशांत शर्माने हमीदला ९ धावांवर माघारी धाडले त्यानंतर जॉनी बेअरस्टोला देखील अवघ्या २ धावांवर माघारी धाडले होते. कर्णधार जो रूटवर हा सामना पुढे घेऊन जायची जबाबदारी होती. परंतु, तो देखील फार काळ टिकू शकला नाही. तो ३३ धावा करत माघारी परतला.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: बुमराहला भिडली इंग्लंडची टीम, मग काय कर्णधार कोहलीने लॉर्ड्सच्या गॅलरीतूनच केली शिवागाळ






