विराट कोहली आणि रिषभ पंत यांच्या धावा काढतानाच्या समन्वयाच्या अभावाची परंपरा जुनी आहे आहे. कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतही असेच काहीसे पाहायला मिळाले. दोघांतील या समन्वयाच्या अभावाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जेव्हा विराट स्वतःच्या निर्णयामुळे बाद होता होता राहिला.
2022 मध्ये भारत आणि बांगलादेशचे संघ कसोटी सामन्यात आमनेसामने होते. रिषभ पंत आणि विराट कोहली खेळत असताना धावा काढण्यात दोघांमध्ये समन्वय नव्हता. त्यावेळी विराट बाद होण्यापासून थोडक्यात बचावला होता. त्यानंतर त्याने पंतकडे रागाने पाहिलेले. पंतने याबाबत माफीही मागितली होती. यावेळीही असेच काहीसे पाहायला मिळाले. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Virat Kohli’s reaction to Rishabh Pant after the confusion on the single #ViratKohli #INDvBAN pic.twitter.com/1nrGQGQF7X
— 𝗦𝗶𝗷𝗼 𝗝𝗼𝘀𝗲𝗽𝗵 (@sijo_jsp) December 23, 2022
ग्रीन पार्कमध्ये भारतीय संघाची फलंदाजी जोरात सुरू होती. कसोटीत कोहलीचा फॉर्म तितका चांगला नसल्याने सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. यादरम्यान विराट एका चेंडू खेळताना काहीसा अडखळला. स्टंपच्या जवळच चेंडू असूनही तो पळू लागला. दुसऱ्या टोकाकडून पंतने त्याला थांबायला सांगितले. विराट अर्ध्या क्रीजवरून परतला तोपर्यंत क्षेत्ररक्षकाने चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला होता. सुदैवाने थ्रो चुकला आणि विराट बाद झाला नाही. त्याने पंतकडे प्रश्नार्थकपणे पाहत हात वर केला. मात्र, विराट बाद न झाल्याने यानंतर दोघेही हसताना आणि एकमेकांना मिठी मारताना दिसले.
A mixup between Virat Kohli and Pant.
– Pant hugs Kohli after Virat survives. 😂❤️pic.twitter.com/2R43IB4Eh8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
चौथ्या दिवशी ही कसोटी चांगलीच रंगतदार अवस्थेत पोहोचली. पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचा खेळ होऊ शकलेला. त्यानंतर सलग दोन दिवस पावसामुळे सामना होऊ शकला नाही. मात्र, चौथ्या दिवशी भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले. भारताने बांगलादेशचा डाव 233 गुंडाळण्यात यश मिळवले. त्यानंतर भारताने आक्रमक फलंदाजी करताना 34 षटकात 285 धावा केल्या. बांगलादेशने चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आपल्या दुसऱ्या डावात 2 बाद 26 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या तुफानापुढे बांगलादेशची अवस्था खराब, कानपूर कसोटी रोमांचक वळणावर
भारताची खतरनाक फलंदाजी! असा पराक्रम पुन्हा होणे नाही, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात हे प्रथमच घडलं
एकमेव, अद्वितीय किंग कोहली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम, क्रिकेटच्या देवालाही मागे टाकलं!