आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) तर्फे आयोजित पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जून पासून साऊथॅम्प्टनवर खेळला जाईल. तिथे भारतीय संघ आपला पहिल्या कसोटी किताब जिंकण्याकरिता न्युझीलंड विरुद्ध दोन हात करील. या अंतिम सामन्यासाठी काही तासांचाच अवकाश असून क्रिकेटचे चाहते या सामन्याची आतुरतेने वाट बघत आहेत.
या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपापल्या 15 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. आतापर्यंत भारत आणि न्युझीलंड संघांदरम्यान 59 कसोटी सामने झाले आहेत ज्यामध्ये 21 वेळा भारतीय संघाने तर 12 वेळा न्युझीलंडने विजय मिळवला आहे. याव्यतिरिक्त 26 सामने अनिर्णित राहिलेले आहे. या विश्वकसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अनेक विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.
कर्णधार म्हणून कोहली घडवणार इतिहास
या अंतिम सामन्यात कोहलीने शतक झळकावले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा कर्णधार म्हणून ओळखला जाईल. शतक करताच कोहली माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटिंगचा विक्रम मोडीत काढेल. कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करतांना 41 शतक झळकावली आहेत, तर पोंटिंगने देखील 41 शतक केली आहेत.
याबरोबरच भारताच्या वर्तमान खेळाडूंपैकी कोहली न्यूझीलंड संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहलीने न्युझीलंडविरुद्ध 51.53 च्या सरासरीने 3 शतक आणि 3 अर्धशतकांच्या साहाय्याने 773 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माला विदेशात 1000 धावा करण्याची संधी
या अंतिम सामन्यात रोहित शर्मा शतक करण्यास यशस्वी झाला तर तो ऑस्ट्रेलियन सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि रॉस टेलरला मागे टाकेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने आतापर्यंत 40 शतक केली आहेत, तर हेडन आणि टेलरनेही प्रत्येकी 40 शतकं केली आहेत. अंतिम सामन्यात शतक करण्यात यशस्वी झाल्यास रोहितचे हे 41 शतक ठरेल. याव्यतिरिक्त विदेशात कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा करण्यासाठी त्याला फक्त 55 धावांची गरज आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत रोहितने आतापर्यंत 1030 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज म्हणून तो अजिंक्य रहाणेच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. रहाणेने या स्पर्धेत 1095 धावा केल्या आहे.
याव्यतिरिक्त 2007 च्या टी20 विश्वचषकपासून ते विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यापर्यंत खेळणारा रोहित एकमेव भारतीय खेळाडू ठरणार आहे. जर भारताने हा अंतिम सामना जिंकल्यास रोहित पहिला खेळाडू ठरेल ज्याच्या नावावर टी20 विश्वचषक(2007), 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकायचा विक्रम असेल.
महत्त्वाच्या बातम्या –