ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आठव्या टी20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गुरूवारी (10 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना ऍडलेड ओव्हलवर खेळला जाणार आहे. सद्यस्थितीत हे दोन्ही संघ क्रिकेटविश्वातील उत्तम संघ ठरत आहेत. कारण आयसीसी क्रमवारीत भारत पहिल्या तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यात भारताच्या दोन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन बलाढ्य विक्रम रचण्याची संधी आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याची बॅट तळपणार असे म्हटले जात आहे. तसे झाले तर त्याच्याकडे एक बलाढ्य विक्रम रचण्याची संधी आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने 4 षटकार खेचले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा पहिला भारतीय आणि दुसरा खेळाडू ठरेल. त्याच्याआधी ही कामगिरी वेस्ट इंडिजच्या क्रिस गेल याने केली आहे. त्याने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार खेचले आहेत. रोहितने या स्पर्धेत 5 सामन्यात केवळ 89 धावा केल्या आहेत.
रोहितबरोबर विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडेही मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. त्याने या सामन्यात 42 धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 4000 धावांचा टप्पा गाठणारा पहिलाच खेळाडू ठरेल. त्याने आतापर्यंत 114 सामन्याच्या 106 डावांमध्ये खेळताना 3958 धावा केल्या आहेत. त्यातील 1091 धावा टी20 विश्वचषकाच्या 26 सामन्यांत केल्या आहेत.
1987 च्या वनडे विश्वचषक उपांत्य फेरीनंतर प्रथमच दोन्ही संघ विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यात आमनेसामने येत आहेत.
तसेच भारत आणि इंग्लंड संघाची या स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर आतापर्यंत भारत उत्तम राहिला आहे. भारताने या स्पर्धेत सुपर 12चे 5 पैकी 4 सामने जिंकत ग्रुप दोनच्या गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले, तर इंग्लंड 5 पैकी 3 सामने जिंकला. त्यांना या स्पर्धेत आयर्लंडकडून पराभवाचा धक्का बसला.
दोन्ही संघात आतापर्यंत 22 टी20 सामने खेळले गेले. ज्यामधील 12 सामने जिंकत भारत आघाडीवर असून इंग्लंडने 10 सामने जिंकले आहेत. तसेच मागील पाच सामन्यांची कामगिरी पाहिली तर भारत 4 आणि इंग्लंड एक असे समीकरण राहिले. टी20 विश्वचषकातही हे दोन्ही संघ तीन वेळा समोरासमोर आले. त्यातील दोन सामने भारताने तर एक सामना इंग्लंडने जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुखापती इंग्लंडचा पिच्छा सोडेना! मलानपाठोपाठ ‘हा’ वेगवान गोलंदाजही झाला जखमी, भारताचे टेन्शन मिटले
टी20 विश्वचषकात अर्शदीपची प्रत्येक 11व्या चेंडूवर विकेट, इंग्लंडचे ‘हे’ दोन गोलंदाज त्याच्या…