यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सेमीफायनल 2 सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. गुरुवारी (27 जून) रोजी गयाना या स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारतानं या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी 7 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. परंतू भारत या स्पर्धेत अपराजित आहे. टी20 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंनी सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत.
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोन दिग्गज खेळाडूंनी इंग्लंडविरुद्ध टी20 सामन्यात सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत. त्यामध्ये विराट कोहलीनं (Virat Kohli) इंग्लंडविरुद्ध 20 टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यानं 639 धावा ठोकल्या आहेत. कोहलीनं 639 धावांमध्ये 5 अर्धशतक ठोकले आहेत. त्यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 80 राहिली आहे.
भारतासाठी इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक टी20 धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितनं इंग्लंडविरुद्ध 15 सामने खेळले असून त्यामध्ये 410 धावा केल्या आहेत. त्यानं इंग्लंडविरुद्ध 1 शतक आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत. इंग्लंडविरुद्ध त्याची सर्वोत्कृष्ट टी20 धावसंख्या नाबाद 100 आहे. रोहितनं या संघाविरुद्ध 43 चौकार आणि 16 षटकार ठोकले आहेत.
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनीही इंग्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यांमध्ये चांगली चमकदार कामगिरी केली आहे. हार्दिकनं 12 टी20 सामन्यात 279 धावा ठोकल्या आहेत. त्यानं 2 अर्धशतकं झळकावली आहेत. सूर्याबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 6 सामन्यात 274 धावा ठोकल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं आहे. सूर्यकुमार यादवची इंग्लंडविरुद्धची सर्वोत्तम टी20 धावसंख्या 117 आहे.
गुरुवारी (27 जून) रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) वर्चस्व गाजवताना दिसू शकतात. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात या दोन दिग्गज खेळाडूंचा दबदबा राहिला आहे. त्यामुळे या बाद फेरी सामन्यात कोणाचं वर्चस्व राहणार? हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
रॉबिन्सननं एका षटकात दिल्या 43 धावा! 134 वर्षात पहिल्यांदाच घडला इतिहास, पाहा व्हिडिओ
IND vs ENG सेमीफायनल 2 सामन्यासाठी का नाही राखीव दिवस? जाणून घ्या
यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा रचणार का इतिहास?