दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेला भारतीय संघ आपला शेवटचा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळत आहे. टी-20 आणि वनडे मालिकेनंतर भारतीय संघाची कसोटी मालिका या सामन्यानंतर संपेल. केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवस वेगवान गोलंदाजांच्या नावावर राहिला. दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ भारताच्या फलंदाजांनीही पहिल्या डावात झटपट विकेट्स गमावल्या. पण यामुळे विराट कोहली याच्या आनंदात कुठलीच कमी आली नाही. विराट लाईव्ह सामन्यात शुबमन गिल याच्यासोबत फुगडी खेळताना दिसला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना केपटाऊनमध्ये बुधवारी (3 जानेवारी) रोजी सुरू झाला. या सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 23 खेळाडूंनी विकेट्स गमावल्या. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 55 धावांवर यजमान संघाला सर्वबाद केले आणि प्रथम फलंदाजीचा त्यांचा निर्णय चुकीचा ठरवला. प्रत्युत्तरात भारतानेही 153 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. दोन्ही संघ पहिल्या डावात स्वस्तात बाद झाल्यानंतर सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव सुरू झाला. दिवसाखेर दक्षिण आफ्रिका संघाने दुसऱ्या डावात 3 विकेट्सच्या नुकसानावर 62 धावांपर्यंत मजल मारली.
विराट कोहली (Virat Kohli) आणि शुबमन गिल (Shumban Gill) यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील आहे. डावातील 15व्या षटकात विराट आणि गिल यांनी फुगडी खेळल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
— Broken Cricket (@BrokenCricket) January 3, 2024
(Virat Kohli and Shubman Gill played Fuggadi in the live match)
केपटाऊन कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर (कर्णधार), एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, लुंगी एलगिडी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटचा राजा विराट! शेवटच्या कसोटीत डीन एल्गरची विकेट घेतली पण सर्वांच मनही जिंकलं, पाहा व्हिडिओ
नाद खुळा! रोहित सेनेने रचला इतिहास, 92 वर्षात जे घडलं नाही ते करुन दाखवलं!