---Advertisement---

एकाच सामन्यात सारखाच पराक्रम करण्यासाठी विराट कोहली, सुरेश रैनामध्ये चुरस

---Advertisement---

चेन्नई। उद्यापासून(23 मार्च) आयपीएलच्या 12 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे.

या सामन्याला चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर(चेपॉक स्टेडियम) रात्री 8 वाजता सुरुवात होईल.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैना आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली या दोघांनाही आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी रैनाला 15 धावांची तर विराटला 52 धावांची गरज आहे.

आत्तापर्यंत आयपीएलमध्ये एकाही फलंदाजाला 5000 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. त्यामुळे रैना किंवा विराट यांच्यापैकी जो कोणी आधी हा टप्पा गाठेल, तो आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करणारा पहिलाच फलंदाज ठरेल. त्यामुळे आता या दोघांमध्ये कोण आधी हा टप्पा गाठणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रैनाच्या नावावर आहे. त्याने 176 सामन्यात 34.37 च्या सरासरीने 4985 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 163 सामन्यात 4 शतके आणि 34 अर्धशतकांसह 38.35 च्या सरासरीने 4948 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

4985 धावा – सुरेश रैना (176 सामने)

4948 धावा – विराट कोहली (163 सामने)

4493 धावा – रोहित शर्मा (173 सामने)

4217 धावा – गौतम गंभीर (154 सामने)

4086 धावा – रॉबिन उथप्पा (165 सामने)

महत्त्वाच्या बातम्या-

उद्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या आठ संघाचे हे आहेत कर्णधार…

अबब!! २५ चेंडूत शतक, ते ही २० वर्षीय खेळाडूने केले, पहा व्हिडिओ

या आशियाई देशांत दिसणार नाही आयपीएल २०१९ चे थेट प्रक्षेपण..

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment