विराट कोहलीचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक श्रीलंकन चाहता त्याला ‘चोकली’ म्हणताना दिसत आहे. कोहली 2 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका वनडे मालिकेत खेळणार आहे आणि या मालिकेत 3 सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कोहली एका खोलीत फलंदाजीचा सराव करत असताना एक व्यक्ती त्याला ‘चोकली-चोकली’ म्हणत चिडवताना दिसत आहे. कोहली विराटचा हा आवाज ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
‘चोकली’ चा अर्थ काय?
‘चोकली’ हा खरंतर विराट कोहलीला चिडवण्याचा एक मार्ग आहे, जो ‘कोहली’ आणि ‘चोकिंग’ या शब्दांच्या मिश्रणातून बनला आहे. कोहलीच्या टीकाकारांचा असा दावा आहे की तो मोठ्या टूर्नामेंटच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये अनेकदा तो चांगली कामगिरी करू शकत नाही. उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर 2019 च्या विश्वचषकातून भारत बाहेर पडला तेव्हा पहिल्यांदाच ‘चोकली’ ऐकू आली. त्या सामन्यात कोहली अवघ्या 1 धावा करून बाद झाला होता. याशिवाय, 2015 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध तो छोट्या धावांवर बाद झाला होता.
Someone called Virat Kohli a chokli in front of him in the dressing room of Colombo ground in Sri Lanka, after which Virat got angry.😭😭
No way now Lankan fan’s also owning Virat Kohli 🙏😹😹😹 pic.twitter.com/ru4KbRUfBX
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) July 31, 2024
विराट कोहलीने टी20 विश्वचषकाच्या यशानंतर या फाॅरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे, मात्र तो वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. सध्या त्यांची नजर श्रीलंकेविरुद्धच्या तीनही एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यावर असेल कारण टीम इंडियाला पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी तयारीसाठी फारच कमी एकदिवसीय सामने मिळणार आहेत. कोहलीने आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध 53 सामने खेळले आहेत त्यातील 51 डावांमध्ये त्याने 63.27 च्या सरासरीने 2,594 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील कोहलीची सर्वाधिक शतके श्रीलंकेविरुद्धच आहेत. श्रीलंकेविरुद्ध त्याने 10 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली आहेत.
हेही वाचा-
पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीस पात्र ठरलेल्या मराठमोळ्या स्वप्नीलची जीवनकथा खूपच रंजक; धोनीशी थेट संबंध
परदेशी खेळाडूंवर टांगती तलवार! बीसीसीआय घेऊ शकते कठोर निर्णय; या कारणामुळे संघमालक हैराण
विराट कोहली एकदिवसीय मालिकेत रचणार इतिहास, रोहित शर्माच्या निशाण्यावर द्रविडचा हा विक्रम